Dating Mistakes Saam Tv
लाईफस्टाईल

Dating Mistakes : तिशीतही करताय डेट? या चुका टाळा, लव लाईफ राहील मस्त

Shraddha Thik

Dating Mistakes In Age Of 30 :

तारुण्यात डेटिंग करणे हा वेगळा अनुभव असतो. सध्याच्या काळात तरुणाई करिअर आणि स्टेबल होण्याकडे जास्त लक्ष देत असल्याने काहींना डेट करणे जमत नाही. त्यामुळे आयुष्यात स्टेबल होईपर्यंत 30 वर्ष उलटून जातात.

जे कपल वयाच्या 30 व्या वर्षीही डेट (Date) करत असतात, अशा लोकांनी आयुष्यात अनेक गोष्टी अनुभवल्या असतात आणि त्यांना नातेसंबंधातून काय हवे आहे हे माहित असते. मात्र, या वयात डेटिंग करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. तुम्हाला ही आव्हाने टाळायची असतील आणि तुमचे नाते (Relation) घट्ट करायचे असेल, तर या चुका करणे टाळा. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया -

तुमचा जोडीदार बदलण्याचा प्रयत्न

वयाच्या 30 व्या वर्षी एकमेकांचे व्यक्तिमत्व (Personality) आणि सवयी चांगल्या प्रकारे समजलेल्या असतात. अशा स्थितीत जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करणे ही मोठी चूक आहे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

तुमचा भूतकाळ विसरणे

वयाच्या 30 व्या वर्षी, लोक त्यांच्या भूतकाळातील अनुभवांमधून बरच काही शिकतात. अशा वेळी तुमचा भूतकाळ विसरून नवीन नात्यात जाणे टाळा. याचा तुमच्या सध्याच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जोडीदारावर खूप दबाव टाकणे

वयाच्या 30 व्या वर्षी लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जोडीदारावर जास्त दबाव टाकणे ही मोठी चूक आहे. यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुरावू शकतो.

स्वत:ला कमी लेखणे

वयाच्या 30 व्या वर्षी लोकांना स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास असतो. अशा स्थितीत स्वत:ला कमी लेखणे ही मोठी चूक आहे. हे तुमच्या नात्यातील आत्मविश्वासाची कमतरता ठरवू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

- जोडीदाराला समजून घेण्यासाठी वेळ काढा. याद्वारे तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्व आणि सवयी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

- तुमच्या जोडीदाराचा स्वतःसारखा स्वीकार करा. यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि आदर वाढेल.

- कोणतेही नाते यशस्वी करण्यासाठी वेळ आणि मेहनत आवश्यक असते. 30मध्ये डेटिंग करत असतानाही, तुमच्या नात्यात वेळ आणि मेहनत करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT