सध्या प्रत्येक स्त्री शिकत आहे. शिकून मोठ्या पदावर नोकरी करत आहे. मुलगी लग्नाच्या वयाची झाल्यावर घरचे तिच्यासाठी मुलगा पाहतात. आता प्रत्येक घरात आपल्या मुलीसाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत संस्कृत घर पाहिले जाते. तसेच मुलगा मुलीपेक्षा जास्तीचे पैसे कमवणारा असतो. त्यामुळे एकाच्या पगारात घर चालत असेल तर, सामान्य कुटुंबांमध्ये अनेक मुली लग्न ठरलं की नोरकी सोडतात.
घरात सर्व व्यक्ती कमवत असतील तर घर कोण सांभाळणार? असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे बहुतेक मुली लग्नानंतर नोकरी सोडून देण्याचा विचार करतात. आता तुम्ही देखील लग्न करत आहात आणि तुमच्यासमोर नोकरी किंवा सासर असा पर्याय असेल तर काय करावे? असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आज त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आंतरमनाचे ऐका
लग्न झाल्यावर आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या आणि नवीन व्यक्ती येतात, नवीन नाती तयार होतात. मात्र करिअरचा विचार या व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याआधीपासून केलेला असतो. त्यामुळे सासर की करिअर असा प्रश्न असेल तर तुमचे मन तुम्हाला जे सांगेल तेच तुम्ही निवडा.
नोकरी सोडणे
आजही अनेक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबात मुली लग्नानंतर शक्यतो सासर निवडतात. सासरी सर्वांची काळजी घेऊन घरी आराम करणे पसंत करतात. तुम्ही देखील हा पर्याय निवडणार असाल तर पुढील गोष्टी नक्की करा.
पतीच्या पगारातील काही रक्कम मागा
जर पतीच्या सांगण्यावरून आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमांमुळे तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पतीला ही गोष्ट नक्की सांगा. पतीला जितका पगार आहे त्यातील काही रक्कम घरखर्च व्यतिरिक्त तुम्हाला देण्यास सांगा. पती यासाठी तयार असेल तरच नोकरी सोडा.
जाणीव करून द्या
अनेकदा मुलींना आपल्या करियरसाठी आणि लग्नासाठी तडजोड करावी लागते. जेव्हा तुम्ही पतीसाठी नोकरी सोडाल तेव्हा हे मी तुझ्यासाठी करत आहे, याची त्याला जाणीव करून द्या.
छोटा व्यवसाय
नोकरी नाही तर पैसे कमविण्याची काहीच साधने नाहीत असे होत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादा छान व्यवसायच करू शकता. यात तुम्हाला पती पूर्णतः मदत करेल यासाठी त्याच्याकडून वचन घ्या.
क्लासेस
तुम्ही जे काही शिक्षण घेतले आहे त्याचे तुम्ही घरच्याघरी क्लास घेऊ शकता. वर्क फ्रॉम होम किंवा मग फ्री लॅन्स घरून काम करू शकता. याने तुम्हाला स्वतः साठी आणि कुटुंबासाठी आणखी काही पैसे सुटतील.
पतीला समजावून सांगा
तुमच्यासमोर पती किंवा नोकरी असा पर्याय असेल तर पतीला तुम्ही नोकरी करणे गरजेचे का आहे ते समजावून सांगा. होणारा पती खरोखर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुम्हाला साथ देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.