Relationships First Date Tips
Relationships Tips SaamTV
लाईफस्टाईल

Relationships Tips : पहिलीच डेट शेवटची ठरू शकते! या टॉपीकने बोलण्यास सुरुवात करा, जबरदस्त इंप्रेशन पडेल

Ruchika Jadhav

पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला आपण डेट करतो तेव्हा आपल्या मनात अनेक विचार येतात. कुठे भेटावं? भेटताना कोणते कपडे परिधान करावेत? खाण्यासाठी काही घेऊन जावं का? या सर्व विचारांसह पहिल्यांदा भेटल्यावर आपण जास्त नर्वस होतो. काहीवेळा पहिल्यांदा भेटल्यावर नेमकं काय बोलावं याच्या विचारात आपण चुकीचं काही बोलतो आणि ती आपली शेवटची भेट ठरते. असं होऊनये यासाठी आम्ही तुमच्यासाठी पहिल्या डेटच्या काही खास टीप्स शोधल्या आहेत.

छान कॉम्पलीमेंटने बोलण्यास सुरूवात करा

एखाद्या छान कॉम्पलीनेंटने बोलण्यास सुरूवात केल्यावर समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर लगेचंच हसू आणि आनंद दिसते. मुलीने परिधान केलेला ड्रेस आणि अन्य एक्सेसरीजवर तुम्ही कॉम्पलीमेंट देऊ शकता. जर मुली देखील मुलांना त्यांनी ज्या रंगाचा शर्ट किंवा आउटफीट परिधान केलं असेल त्यावर कॉम्पलीमेंट देऊ शकतात. याने पॉझिटीव्ह वाइब्स तयार होतात.

छंद विचारा

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे छंद असतात. मात्र कामामुळे आपल्याला आपले सर्व छंद जोपासता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही बोलत असताना समोरच्या व्यक्तीला त्याचे छंद विचारा. समोरच्या व्यक्तीबद्दल थोडं जाणून घेतल्यावर त्यांच्याशी संवाद साधणं थोडं सोप्प जातं.

अनुभव शेअर करा

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट आणि मजेशीर किस्से घडतच असतात. त्यामुळे पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील सर्व मजेशीर किस्से सांगण्यास सुरुवात करा. त्यामुळे दोघांमध्ये खेळीमेळीचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल.

खाण्या-पिण्याच्या सवयींवर बोला

प्रत्येक व्यक्तीला विविध पदार्थ खायला आवडतात. आता तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवत असाल तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या अन्य पदार्थांबाबत सुद्धा विचारा. आवडीचे पदार्थ समजल्याने आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करता येतं.

टीप : पहिल्यांदा डेटवर गेल्यावर काय बोलावे? याविषयाची ही सामान्य माहिती आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero ने लॉन्च केली नवीन कार्बन फायबर बाईक, फक्त 'हेच' लोक खरेदी करू शकतील

Nikita Dutta: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

SCROLL FOR NEXT