Mental Health Issue Saam Tv
लाईफस्टाईल

Mental Health Issue : रिलेशनशिपमुळं टेन्शन वाढतंय; या वयातील महिला-पुरुषांचं मानसिक आरोग्य ढासळतंय, धक्कादायक आकडेवारी

Relationship Affect Mental Health : तुम्ही अनेकवर्ष जोडीदारासोबत एकत्र असलेल्या नात्यामधून अचानक बाहेर पडला असाल. तुम्हाला एकटे वाटत असेल तर असे असणे साहाजिक आहे. ब्रेकअपचा आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Relationship Tips :

शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये अनेक प्रेम प्रकरणे असतात. नातं कोणतेही असो, त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा अधिक असतो. तुम्ही भावनिकदृष्ट्या नात्यात अधिक जोडले गेले असाल तर आणि तुमच्या नात्याला तडा गेला असेल तर मानसिकतेवर परिणाम होतो.

तुम्ही अनेकवर्ष जोडीदारासोबत (Partner) एकत्र असलेल्या नात्यामधून अचानक बाहेर पडला असाल. तुम्हाला एकटे वाटत असेल तर असे असणे साहाजिक आहे. ब्रेकअपचा आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर (Mental Health) देखील परिणाम होतो. ज्यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या रिलेशनशीपचा (Relationship) सर्वाधिक त्रास पुरुषांमध्ये दिसून आला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रांने दिलेल्या माहितीनुसार कोविड- १९ च्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळाल्या होत्या. त्यावेळी बीएमसीने मानसिक आरोग्यावर मात मिळवण्यासाठी हेल्पलाइन तयार केली. त्यात मागच्या तीन वर्षापासून मुंबईसारख्या शहरातून १.१९ लाख लोकांचे कॉल आले आहेत. या हेल्पलाइनचा उद्देश तणाव, चिंता आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तींना मदत करणे आहे.

यामध्ये ३८ टक्के लोक ब्रेकअप किंवा रिलेशनशीप, २४ टक्के लोक डिप्रेशन, २२ टक्के चिंता, ९ टक्के लोक तणाव आणि ७ टक्के लोक मनोरुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक नोंद ही पुरुषांची केली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो.

या संशोधनातून असे कळाले आहे की, मागच्या तीन वर्षात ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिलांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आहे. तसेच यामध्ये १८ पेक्षा कमी असणाऱ्या लोकांचे प्रमाण२७ टक्के, १८ ते २५ वयोगटातील लोकांचे प्रमाण ३१ टक्के, २६ ते ४० वयोगटात ३७ टक्के, ४१ ते ५५ वयोगटात ४ टक्के तर ५५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे प्रमाण १ टक्के इतके आहे.

कमी वयात मानसिक तणावाचा शिकार झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका, दमा, मधुमेह, रक्तदाब, सतत चिडचिड करणे, निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या मानसिक त्रासाचे सर्वाधिक कारण हे बेरोजगारी, जीवनशैलीतील बदल, नातेसंबंधातील संघर्ष, घटस्फोट आहे. तसेच जर तुम्हालाही मानसिक तणावावर मात करायचे असेल तर टोल फ्री क्रमांक १८००-१२०-८२००५० कॉल करता येईल. तसेच बीएमसीची ही सेवा २४x७ सुरु राहिलं असे देखील म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

SCROLL FOR NEXT