Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्न सोहळ्याला विशेष महत्व आहे. लग्न हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. लग्न जुळण्यापासून ते लग्न होईपर्यंत अनेक विंधी, प्रथा पद्धती पार पाडल्या जातात.
लग्नसोहळ्यात दोन कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने हा सोहळा साजरा करतात. लग्नासाठी घराबाहेर मंडप बांधण्याची जुनी परंपरा आहे. हिंदू धर्मातील जुन्या परंपरा आजही पाळल्या जातात.
मात्र तुम्हाला माहितीये का? लग्नासाठी घराबाहेर मंडप का बांधतात यामागचं नेमकं कारण काय? लग्नासाठी छोटा का असेना पण मंडप बांधला जातो. ही एक जुनी परंपरा आहे.
मंडप हा लग्नाचा केंद्रबिंदू मानला जातो, जिथे पवित्र विधी पार पाडले जातात. हा जोडप्यासाठी एका नव्या घराचे प्रतीक आहे, जे त्यांच्या एकत्र जीवनाची सुरुवात दर्शवते.
लग्नाचे पारंपारिक विधी करण्यासाठी पवित्र आणि सुरक्षित जागा म्हणून मंडप बांधतात.
लग्नमंडपाच्या खांबांना विशेष महत्व असते. मंडपाचे चार खांब प्रेम, विश्वास, आदर आणि समज यांचे प्रतीक आहेत. घराबाहेर मंडप बांधल्याने लग्नाला भव्य स्वरूप प्राप्त होते व शोभा येते.
सुरूवातीच्या काळात स्वच्छता व जागेच्या अभावामुळे घरांमध्ये लग्न करणे शक्य नव्हते अशावेळी घराबाहेर मंडप बांधले जात असत.