Belly Fat Saam TV
लाईफस्टाईल

Belly Fat : बेली फॅट कमी करण्यासाठी जीममध्ये जाण्याची गरज नाही; घरीच ही आसने करून ढेरी गायब होईल

Reduce Belly Fat : बेली फॅट, पोटावर वाढलेली जास्तीची चरबी कमी करण्यासाठी योगा करणे सुद्धा फायदेशीर आहे.

Ruchika Jadhav

जीवनातील विविध व्याधी आजार, मानसिक ताण-तणाव आणि अन्य बऱ्याचशा समस्या योगा केल्याने दूर होतात. अशात सध्या कामात व्यस्त असल्याने अनेक व्यक्तींना स्वत:साठी आणि स्वत:च्या हेल्थसाठी अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे लठ्ठपणाच्या समस्या जास्त वाढल्या आहेत. लठ्ठपणा जास्त वाढल्याने काही काळाने व्यक्तींना आजारही जडतात. त्यामुळे या आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी योगा करणे फायदेशी आहे.

योगा केल्याने फक्त मानसिक नाही तर शारीरीक आरोग्य सुधारतं. तसेच ज्या व्यक्ती योगा करतात त्यांना शरीरावरील अतिरिक्त चरबी आणि बेली फॅट कमी करण्यास सुद्धा मोठी मदत होते. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य आसने आणि आसने करण्याची योग्य पद्धत माहिती पाहिजे. त्यानेच तुम्हाला व्यवस्थित बारीक होता येईल.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन आसन अगदी सोपं आहे. मात्र तितकंच प्रभावी आणि उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर बसा. त्यानंतर पोटातून बेंड व्हा. तुम्हाला तुमचं डोकं पायांजवळ न्यायचं आहे. तसेच दोन्ही पाय दोन्ही हातांनी पकडायचे आहेत. हे आसन किमान १० मिनिटे ५ वेळा तरी केले पाहिजे. तरच तुम्हाला थोडाफार रिझल्ट दिसेल.

धनुरासन

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी धनुरासन फार उपयुक्त आहे. धनुरासन करणे काही व्यक्तींना कठीण सुद्धा वाटू शकते. ज्या व्यक्तींचे ऑपरेशन आणि पोटाला टाके असतील अशा व्यक्तींनी हे आसन करू नये. यासाठी जमिनीवर पालथं झोपावं लागेल. त्यानंतर तुमचे पाय मागच्याबाजुने हातांनी उचलून घ्या. या पोजमध्ये फक्त तुमचं पोट जमिनीला टेकलेलं असतं. तसेच तुमचे पूर्ण शरीर हवेत असते. अशा पद्धतीने तुम्ही धनुरासन करू शकता.

भुजंगासन

भुजंगासन केल्याने बेली फॅटसह मान आणि पाठीवरील चरबी सुद्धा कमी होते. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा जमिनीवर पालथं झोपावं लागेल. असे झोपल्यावर तुम्हाला तुमचे हात जमिनीवर टेकवून घ्यावे लागतील. हात जमिनीवर असल्यावर पुढे मानेपासून कमरेपर्यंतचा भाव वर उचलून घ्या. उलट दिशेने शरीर फिरल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT