Bad Cholesterol Saam TV
लाईफस्टाईल

Bad Cholesterol : जीवावर बेतण्याआधीच कोलेस्ट्रॉल कमी करा; रोजच्या आहारात 'हा' बदल गरजेचा

Reduce Bad Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात झाली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे. यामध्ये आम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्या व्यक्तीने औषधांसह आहारात काय बदल केले पाहिजेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे आजवर अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरूवात झाली की अनेक व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीभेवर ताबा ठेवाव लागतो त्यामुळे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आरोग्याची काळजी घेत नाहीत. परिणामी हा आजार दुप्पटीने वाढतो आणि अगदी कमी वयात म्हणजे तिशी आणि चाळीशीत सुद्धा व्यक्तींचा मृत्यू होतो.

आता तुम्हाला देखील शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात झाली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे. यामध्ये आम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्या व्यक्तीने औषधांसह आहारात काय बदल केले पाहिजेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

रिकाम्यापोटी खा हे फळ

तुमच्या शरीरात जास्तप्रमाण बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते नियंत्रीत ठेवण्यासाठी सकाळी एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर एक सफरचंद खा. सफरचंद या फळात जास्त व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी याची मोठी मदतत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला कोणताही अन्य आजार होणार नाही.

मीठ

पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठाचा उपयोग केला जातो. आता तुम्ही सुद्धा आहारात मीठ वापरत असाल तर त्याचं प्रमाण आजपासून कमी करा. कारण मिठाने पदार्थाची चव जितकी रुचकर लागते तितकाच तो पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक बनत जातो. त्यामुळे ज्या व्यक्ती आहारात जास्त मीठ वापरतात किंवा पदार्थांवरून फळांवरून मीठ फिरवून खातात त्यांना बॅड कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागतो.

मांसाहार नको

मांसाहार पचण्यासाठी जड असतो. काही व्यक्ती रात्री उशिरा जेवण करतात. रात्री ७ च्या नंतर मांसाहार केल्यास ते अन्न सकाळी पचत नाही. त्यामुळे पोट दुखी आणि गॅस सारख्या समस्या वाढतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पासून वाचण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात मांसाहार कमी करा.

मद्यपान करू नका

बदलत्या कामाच्या पद्धतीने अगदी कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आणि मुली देखील कमी वयातच मद्यपान करताना दिसतात. मात्र वयाची ३० शी ओलांडल्यावर याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल अनियंत्रीत होतं. खाण्यापिण्याच्या सर्व सवयी पाळून तुम्ही मद्यपान करत असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचा दावा करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांचे छत्र हरपलं, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक; IAS दिव्या तंवर यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: चांदीत एकाच दिवसात ३००० रुपयांची वाढ

Maharashtra Politics : मुंबई मोठा राडा; ठाकरे आणि शिंदे गट भिडला, नेमकं काय घडलं? VIDEO

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT