सरकारी नोकरीच्या शोधार्थ आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एजन्सीने अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इंटेलिजन्स ब्युरोने IB ACIO ग्रेड -२ कार्यकारी परीक्षा २०२३ चं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केलीय. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/कार्यकारी पदांसाठी २५ नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झालीय. ही नोंदणी १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. (Latest News)
ज्या उमेदवारांना नोंदणी करायची आहे, त्यांनी एमएचएच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.inवर लॉगिन करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेत ९९५ पदे भरली जाणार आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पात्रता
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असला पाहिजे. तर उमेदवाराचं वय हे १८ वर्ष ते २७ वर्ष असणं आवश्यक आहे.
IB ACIO Grade 2/ Executive Exam 2023 : असा करा अर्ज
आधी MHA mha.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर What's New विभागावर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.
या पेजवर IB ACIO Grade 2/Executive Exam 2023 या पर्यायावर क्लिक करा.
परत एक नवीन पेज तयार होईल जेथे उमेदवार नोंदणी करू शकतील. नोंदणी झाल्यानंतर तेथे तुमचं खाते तयार होईल.
भरती संदर्भात माहिती अधिकची माहिती हवी असेल तर येथे करा क्लिक
यानंतर अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करत ते पेज डाऊनलोड करून टाका. जेणेकरून परीक्षाच्या वेळी तुमच्याकडे एक हार्ड कॉपी राहील. दरम्यान परीक्षा शुल्क ₹१०० आहे आणि भरती प्रक्रिया शुल्क ₹ ४५० रुपये आहे. UR, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना परीक्षा शुल्क आणि प्रक्रिया शुल्क सर्व उमेदवारांनी भरावे लागेल. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, युपीआय, एसबीआयचं चलन काढून एसबीआयच्या ईपेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.
इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा तीन पद्धतीने घेतली जाणार असून या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ देण्यात आलाय. पहिल्या चरणात एक-एक गुणासाठी १०० प्रश्न असतील. सुरुवातीची परीक्षा ही ऑब्जेटिव्ह होईल. यासोबत चालू घडामोडी, जनरल स्टडीज, न्युमेरिकल अॅप्टीट्युड, रिजनिंग आणि लॉजिकल अॅप्टीट्युड, तर इंग्रजीतील एकूण ५ विभाग असतील. या प्रत्येक सेक्शनसाठी २०-२० मार्क असतील. यात एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.