10th, 12th Board Exams: '10 वी, 12 वीची परीक्षा वर्षातून दोनदा देणं बंधनकारक नाही', काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

Two Opportunities For Students For Reduce Stress: विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक वेळ मिळावा आणि ताण कमी व्हावा यासाठी दोन संधी
10th, 12th Board Exams
10th, 12th Board ExamsSaam Digital
Published On

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र, दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळवता यावं, त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा आणि ताण कमी व्हावा यासाठी दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत अलीकडेच वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ऑगस्टमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम जारी केला होता.

शिक्षणमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा जेईई सारखंच वर्षातून दोन वेळा ( १०वी, १२ वी ) च्या परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. यामध्ये ते चांगले गुण मिळालेल्या परीक्षेचा पर्याय निवडू शकतात. मात्र, हे सर्व ऐच्छिक असून कोणतही बंधन नसणार आहे. कारण, विद्यार्थी आपलं वर्ष वाया गेलं, चांगलं गुण मिळवता आले असते या गोष्टीमुळे नेहमी तणावात असतात. त्यामुळे केवळ एका संधीच्या भीतीतून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि या परीक्षेतील प्रगतीवर खुश असेल तर त्या विद्यार्थ्यांने पुढची परीक्षा दिली नाही तरी चालेल. काहीही अनिवार्य नसेल, असंही ते म्हणाले

10th, 12th Board Exams
Israel and Palestine: कोण आहे हमासचा प्रमुख; का अन् कधी केली हमासची स्थापना? काय होता वाद?

ऑगस्टमध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. नवीन अभ्रासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ) च्या घोषणेनंतर आपण स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी या निर्णयाची प्रशंसा केली असून या विचारावर ते खुश आहेत. त्यामुळे २०२४ पासून सरकार वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

  • नवीन अभ्रासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ) मध्ये असतील हे बदल

  • वर्षातून दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा

  • कोणत्याही एका परीक्षेतील चांगले गुण निवडण्याचा पर्याय

  • ११, १२ वी च्या विद्यार्थ्यांना विषय निवडीची लवचिकता असेल

  • २०२४ शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके

  • पुस्तकांना कव्हर घालण्याचा प्रकार टाळला जाईल

  • पुस्तकांच्या किमतींवरही विचार केला जाणार

  • मागणीनुसार शाळा मंडळे परीक्षा देण्याची क्षमता विकसित करतील.

नवीन सत्रानुसार पाठ्यपुस्तके विकसित केली जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ५+३+३+४ अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संरचनेच्या आधारावर चार राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार केले आहेत. ज्याची एनईपी २०२० ने शालेय शिक्षणासाठी शिफारस केली आहे.

10th, 12th Board Exams
Viral News: बाबो! दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या खात्यात आले तब्बल ७५३ कोटी, पुढे जे घडलं ते...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com