Indian Navy Govt job  social media
लाईफस्टाईल

Job News: भारतीय नौदलात बंपर भरती; मुलाखत न देता दहावी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी, लगेच करा अर्ज

Indian Navy Govt job : दहावी पास उमेदावरांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी. उमेदवारांना थेट नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे नोकरीसाठी नियुक्त केली जाणार आहे.

Bharat Jadhav

Indian Navy Govt job :

भारतीय नौदलात मोठी बंपर भरती सुरू असून यात दहावी पास उमेदावरांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही केंद्र सरकारची नोकरी असणार आहे. भारतीय नौदलाने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. तब्बल २७५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छूक उमेदवारांनी apprenticeship.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोकरीचा अर्ज करावा. (Latest News)

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १ जानेवारी २०२४ आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना थेट नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे नोकरीसाठी नियुक्त केली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाहीये. फक्त लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अर्ज करण्यासाठी काही नियमांचे पालक करावे लागणार आहे. जर त्या नियमांचे पालन हे केले गेले नाही तर तुमचा अर्ज अवैध ठरवला जाईल. यामुळे अर्ज करताना सूचना नीट वाचा. या भरती प्रक्रियेद्वारे विविध ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारांच्या एकूण २७५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे अर्ज करताना नेमक्या कोणत्या ट्रेडसाठी तुम्ही अर्ज करत आहात हे व्यवस्थितपणे बघा.

उमेदवार दहावीसह आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर काही महिन्यांमध्ये याची परीक्षा ही घेतली जाईल. परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र दिले जाईल. अर्ज करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, आयटीआय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र आणि क्रीडा प्रमाणपत्र लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

SCROLL FOR NEXT