रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन- भाग २ Saam Tv
लाईफस्टाईल

रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन- भाग २

आपण कशाप्रकारे अपुरे पडतो आणि त्याने आपलीच हानी कशी होते हे आपण 'रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन' या लेखाच्या पहिल्या भागात जाणून घेतलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण तयारी तगडी ठेवत नसल्याने खऱ्या आव्हानाच्या वेळी आपण कशाप्रकारे अपुरे पडतो आणि त्याने आपलीच हानी कशी होते हे आपण 'रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन' या लेखाच्या पहिल्या भागात जाणून घेतलं. आता या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण ही तयारी कशी करायची हे जाणून घेऊयात...Recovery and Rehabilitation Part 2

हे देखील पहा-

गेल्या एक वर्षात आपण अनेक डॉक्टर्स व संशोधकांकडून ऐकत आलो आहोत की प्रतिकारशक्ती ही मुळात ज्यांची चांगली आहे, ज्यांना इतर कोणतेही मोठे आजार नाहीत आणि जे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगतात, त्यांना कोरोनाचा सगळ्यात कमी त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. माझ्या मागील वर्षातील प्रतिकारशक्तीवर लिहिलेल्या लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे 'Low immunity is unbalanced internal environment'. इम्यूनिटी एका दिवसात येत नसून 'sweat more in training' प्रमाणे जीवनशैलीचा भाग म्हणून योग्य व्यायाम-योगाचा सराव, योग्य आहार, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली या सर्वांनी विकसित होणार आहे. आणि अशानेच आपण 'bleed less in war' ही अवस्था आपण गाठू शकणार आहोत.

कोविड होऊन गेलेल्या सर्वांनी पुन्हा पूर्वीच्या आयुष्याप्रमाणे बेधुंद होण्याआधी औषधांचा झालेला मारा, त्यांचा दुष्परिणाम व पूर्ववत शारीरिक शक्ती, स्टॅमिना, श्वसनाच्या आरोग्याचे पुनर्वसन व आलेली नकारात्मकता यांवर तातडीने काम केले पाहिजे. कमकुवत शरीर व मनाने चाललंय तसं चाललंय असं न करता कोविड होऊन गेलेल्यांनी योगासने, प्राणायाम यांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर पौष्टिक आहार व वेळेत झोप याकडेही लक्ष द्यायला हवे. खऱ्या अर्थाने बरे होणे म्हणजे नुसते ‘आजारी नाही’ असे नसून 'रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन' हे दोन्ही अविभाज्य भाग आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

SCROLL FOR NEXT