Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Karle Bhaji Recipe: कडू कारल्याचे बनवा टेस्टी अन् कुरकुरीत भजी; रेसिपी पाहा

Recipe: कारलं म्हटलं तरी अनेकांना ते आवडत नाही. कडू कारलं खाण्यासाठी लहान मुले कंटाळा करतात. कारले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळेच लहान मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी कारल्याचे भजी बनवू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crispy Karle bhaji Recipe:

कारलं म्हटलं तरी अनेकांची तोंड वाकडी होतात. अनेकांना कारलं आवडत नाही. कडू कारलं खाण्यासाठी लहान मुले कंटाळा करतात. मात्र, कारलं शरीरासाठी खूप चांगले आणि पौष्टिक असते. त्यामुळे कारले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळेच तुम्ही घरच्या घरी कारल्याचे भजी बनवू शकतात.

कारल्याची भजी हे चवीला अत्यंत स्वादिष्ट असतात. घरच्या घरी अगदी झटपट पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात. कारल्याची भाजी आवडत नाही. परंतु कारल्याचे भजी सर्वांना नक्कीच आवडतील. त्यामुळे ही रेसिपी लगेच ट्राय करा. (Latest News)

साम्रगी

  • कारलं

  • तेल

  • हिंग

  • हळद

  • लाल तिखट

  • जिरे पावडर

  • मीछ

  • कढीपत्ता

  • बेसन

  • तांदळाचे पीठ

  • कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम कारलं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे गोल आकारात बारीक काप करुन घ्या.

कारलं कापल्यावर त्यातील बिया काढून टाका. कापलेल्या कारल्यात हिंग, हळद, लाल तिखट, जिरे पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.

या मिश्रणात लिंबाचा रस पिळून घ्या. त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन पीठ घाला.

या सर्व मिश्रणाला एकजीवर करुन घ्या. १५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.

यानंतर दुसऱ्या पातेल्यात बेसन घ्या. त्यात तांदळाचे पीठ टाका. चवीनुसार मीठ टाका. भजीच्या पीठासारखे हे पीठ भिजवून घ्या,

गॅसवर कढईत तेल गरम करुन घ्या. त्यानंतर कारल्याचे तुकडे बेसन पीठात बुडवून गरम तेलात हलक्या हाताने सोडा.

मंद आचेवर कारल्याचे भजी तळून घ्या. आता हे भजी तुम्ही पुदिण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: पन्नाशी गाठलेली मलायका अजुनही इतकी फिट कशी?

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Winter Care: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Chandrapur News : पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप; भद्रावती येथील प्रकार, पोलिसांनी टाकली धाड

Fortune Powerful people list : फॉर्च्युनच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर, जगातील शक्तिशाली व्यक्ती कोण?

SCROLL FOR NEXT