Recharge In Wrong Number Saam tv
लाईफस्टाईल

Recharge In Wrong Number : चुकून दुसऱ्याच्या नंबरवर रिचार्ज गेलाय, काळजी नका करू; असे मिळतील पैसे परत

Recharge Done On Wrong Number : बरेचदा एका अकाउंटवरुन आपण आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींचे रिचार्ज करतो.

कोमल दामुद्रे

Mobile Recharge : हल्ली रिचार्ज करण्यासाठी Google Pay, Phone pe, Recharge Apps, Paytm यांसारखे अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहे. बरेचदा एका अकाउंटवरुन आपण आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींचे रिचार्ज करतो.

परंतु, कधी कधी घाईमध्ये रिचार्ज करताना दुसऱ्या व्यक्तीचा रिचार्ज होतो. अशावेळी पैसे तर जातातच आणि आपला रिचार्जही होत नाही. अशावेळी घाबरुन जाऊ नका. या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे गेलेले रिचार्जचे पैसे परत मिळवू शकतात.

1. पूर्ण पैसे कसे परत मिळवायचे?

जर चुकून तुम्ही दुसऱ्या स्मार्टफोनसाठी (Smartphone) रिचार्ज केले असेल तर यासाठी तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरची मदत घ्यावी लागेल.

तुम्ही ज्या टेलिकॉम कंपनीचे (Company) सिम वापरत आहात त्या टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता. Jio, Vodafone Idea आणि Airtel कडून मदत मिळवण्यासाठी तुम्ही तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या कस्टमर केअर ईमेल आयडीची मदत घेऊ शकता.

VI- customercare@vodafoneidea.com

एअरटेल airtelpresence@in.airtel.com

JIO- care@jio.com

रिचार्जशी (Recharge) संबंधित सर्व माहिती कस्टमर केअर अधिकाऱ्याला दिल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच रिफंडची प्रक्रिया पुढे जाईल.

2. टेलिकॉम कंपन्यांनी मदत केली नाही तर तक्रार कुठे करायची ?

जर तुम्ही कस्टमर केअरशी बोलला असाल आणि तरीही पैसे परत मिळाले नाही तर त्याबद्दल तक्रार तुम्ही ग्राहक मंचावर करु शकता. तुम्ही ग्राहक मंचाचे ग्राहक सेवा अॅप डाउनलोड करू शकता. अॅपवर तक्रार नोंदवण्यासाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे शेअर करावी लागतील. तुम्ही चुकून ज्या क्रमांकासाठी रिचार्ज केला आहे, तो क्रमांक थोड्या फार प्रमाणात सारखाच असला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Tourism : धुळे जिल्ह्यातील २ सुंदर धबधबे, मिळेल स्वर्गसुखाचा अनुभव

Maharashtra Live News Update : काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भूमिपूजनावरून वाद

Ladki Bahin Yojana : सरकारच्या तिरोजीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या...

Kalyan News: शालिमार एक्स्प्रेसमधून ८.५ किलो गांजा जप्त; कल्याणमध्ये GRPF पोलिसांची मोठी कारवाई|VIDEO

Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

SCROLL FOR NEXT