Realme 11x 5G Saam Tv yandex
लाईफस्टाईल

Realme 11x 5G Review: प्रत्येकाच्या बजेटमधला ५ जी मोबाईल; जाणून घ्या मोबाईलचा लूक अन् फिचर्स

Realme 11x 5G: कंपनीने Realme 11x 5G मोबाईल बाजारात आणला असून हा फोन प्रत्येकांच्या खिश्याला परवडणारा आहे.

Bharat Jadhav

Realme 11x 5G Mobile:

भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षात रिअलमी मोबाईल कंपनीने मध्यमवर्गीयांना परडवतील असे मोबाईल फोन तयार केली आहेत. कमी बजेटमध्ये भारी फिचर्स मोबाईलमध्ये मिळत असल्यामुळे रिअलमी कंपनी खूप कमी वेळेत लोकप्रिय मोबाईल निर्माती कंपनी बनलीय. अनेकांना परवडणारा मोबाईल आणणाऱ्या या कंपनीने आता स्वस्तातील ५ जी मोबाईल फोन आणला आहे.

कंपनीने Realme 11x 5G मोबाईल बाजारात आणला असून हा फोन प्रत्येकांच्या खिश्याला परवडणारा आहे. शिवाय कंपनीने या मोबाईलला सर्वात भारी फिचर्स दिली आहेत. कंपनीने या मोबाईलची किंमत फक्त १५ हजार रूपयांपर्यंत असेल असं सांगण्यात येत आहे. जर तुम्ही स्वस्तातील फोन घेण्याच्या विचारात असाल तर हा फोन तुमच्यासाठी योग्य ठरेल. या मोबाईलचे फिचर्स आणि लूक पाहून तुम्ही या फोनची किंमत जास्त असेल असं म्हणाल.

दोन प्रकारात मिळेल स्वस्तातील ५जी मोबाईल

ग्राहकांची पसंद लक्षात घेत कंपनीने दोन प्रकारात हे मोबाईल बाजारात आणले आहेत. यातील पहिला प्रकारातील मोबाईलमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आलीय. याची किंमत फक्त १४हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकारातील मोबाईलला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याचा किंमत फक्त १५ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आलीय.

Realme 11x 5G Mobile चे वैशिष्ट्ये

प्रत्येकाला आकर्षित करणारी डिझाइन कंपनीने या मोबाईल दिलीय. या फोनची डिझाइन पाहून तुम्ही म्हणाल की या मोबाईलची किंमत जास्त असेल.परंतु आपल्या बजेटमध्ये असणारा फोन आहे. ग्राहकांना पर्पल डॅन आणि मिडनाईट ब्लॉक चा पर्याय निवडता येणार आहे. मोबाइलची मागील बाजूस काचेचं डिझाइन देण्यात आलीय. यामुळे हा फोन प्रत्येकांचे लक्ष त्याच्याकडे वळवतो. (Latest News)

मोबाईलच्या मागील बाजूस असलेला कॅमेरा हा वर्तुळात देण्यात आलाय. यामुळे या मोबाईलला एखाद्या महागड्या मोबाईलचा लूक मिळतो. कंपनीने मोबाईलला ६.७२ इंचाचा डिस्प्ले दिलाय. अगदी नाजुक हाताने या डिस्प्लेवर काम करता येणार आहे. परंतु कंपनीने एलसीडी पॅनल यासाठी दिलाय, यामुळे डिस्प्ले खूप चांगला आहे, असं म्हणून शकत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मोबाईलमध्ये MediaTek’s new Dimensity 6100+ 5G चं प्रोसेसर मिळतं. या प्रोसेसरला ६ एनएम टेक्नॉलजीसह तयार करण्यात आलं आहे. याचा स्पीड हा २.२ GHz आहे. जर तुम्ही अधिक वेळा मोबाईल वापरत असाल तर हा REALME 11X 5G मोबाईल उत्तर पर्याय आहे. चित्रपट पाहणं, गाणं ऐकणे, इंटरनेटचा वापर करत असाल तर त्यासाठी हा मोबाईल उत्तम आहे.

परंतु जर तुम्ही त्यात हेवी गेमिंगसाठी घेत असाल तर तुम्ही निराश होऊ शकतात. गेमिंगसाठी हा मोबाईल चांगला प्रतिसाद देत नाही. दरम्यान कॅमेरासाठी हा मोबाईल उत्तम आहे. या मोबाईलला कंपनीने ६४ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा दिलाय. लो लाईट फोटोग्राफी करत असाल तर हा मोबाईल उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT