Honda ने आणली सूटकेस-डिझाइन मिनी 'ई-स्कूटर', कारमध्येही होईल फिट; किती आहे किंमत?

Honda Suitcase Scooter India: Honda ने आणली सूटकेस-डिझाइन मिनी 'ई-स्कूटर', कारमध्येही होईल फिट; किती आहे किंमत?
Honda Suitcase Scooter India
Honda Suitcase Scooter IndiaSaam Tv

Honda Suitcase Scooter India:

Honda ने नवीन Motocompacto मिनी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही एका लहान सुटकेससारखे दिसते. या ई-स्कूटरमध्ये हँडल, फूटरेस्ट, व्हील आणि सीट सारखे भाग लपलेले असतात. याला एक साइड स्टँड देण्यात आला आहे.

यात समोर आणि मागे एलईडी दिवे देखील आहेत. होंडाचे म्हणणे आहे की, ही मिनी ई-स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 19 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या ई-स्कूटरची खास गोष्ट म्हणजे ती कारमध्ये ठेवून तुम्ही सहज प्रवास करू शकाल.

Honda Suitcase Scooter India
Smartphone Offers: 108MP चा दमदार कॅमेरा, 128GB स्टोरेज; 'हा' जबरदस्त स्मार्टफोन 30 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

3.5 तासात होणार पूर्ण चार्ज

मोटोकॉम्पॅक्टोला पॉवर देण्यासाठी 490-वॅट, 16Nm इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. याची टॉप स्पीड 24kph आहे. यात 6.8Ah बॅटरी पॅक आहे. Honda चे म्हणणे आहे की, ही एका चार्जवर 19Km ची रेंज देते. ही मिनी ई-स्कूटर 15-amp आउटलेटमध्ये प्लग केलेले ऑन-बोर्ड चार्जर वापरून चार्ज केली जाऊ शकते. ही 3.5 तासात पूर्णपणे चार्ज होते. (Latest Marathi News)

कारच्या बूटमध्ये सहज बसेल

या मिनी इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 19 किमी आहे. मात्र किती वजनाने प्रवासी त्यावरून प्रवास करू शकतात, याची माहिती कंपनीने शेअर केलेली नाही. होंडाचे म्हणणे आहे की, ही कारच्या बूटमध्ये सहज ठेवता येते.

Honda Suitcase Scooter India
Twitter (X) वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार, इलॉन मस्कने दिले संकेत...

किती आहे किंमत?

ही छोटी ई-स्कूटर सध्या अमेरिकेत 995 डॉलर्समध्ये (अंदाजे रु 82,000) विकली जात आहे. कंपनी ही स्कूटर भारतात कधी लॉन्च करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com