Twitter (X) वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार, इलॉन मस्कने दिले संकेत...

Elon Musk News: Twitter (X) वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार, इलॉन मस्कने दिले संकेत
Elon Musk
Elon MuskSaam Tv
Published On

Elon Musk News:

गेल्या वर्षी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क याने त्यात अनेक मोठे बदल केले आहेत. आता ट्विटरचे नाव बदलून X असे ठेवण्यात आले आहे.

यातच आता ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच ट्विटर वापरासाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. असे संकेत स्वतः मस्त याने दिले आहेत. मस्क याने या बदलामागे फेक अकाउंट आणि बॉट्सचा उल्लेख केला आहे.

Elon Musk
Smartphone Offers: 108MP चा दमदार कॅमेरा, 128GB स्टोरेज; 'हा' जबरदस्त स्मार्टफोन 30 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

इलॉन मस्कचं म्हणणं आहे की, जर मासिक शुल्क भरावे लागले तर फक्त रिअल युजर्स X वापरतील आणि फेक किंवा बॉट अकाउंट या प्लॅटफॉर्मवर प्रभाव टाकू शकणार नाहीत. सीएनबीसीच्या अहवालात प्लॅटफॉर्ममधील या संभाव्य बदलाबाबत माहिती देण्यात आली आहे. परंतु यासाठी युजर्सला किती पैसे द्यावे लागतील, हे मस्कने सांगितले नाही.  (Latest Marathi News)

55 कोटींपेक्षा जास्त युजर्स

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करताना इलॉन मस्क याने X शी संबंधित काही डेटा शेअर केला. त्यानी सांगितलं की, X चे सध्या 55 कोटी युजर्स आहेत. जे दर महिन्याला प्लॅटफॉर्म वापरतात. त्याने सांगितले की, मायक्रोब्लॉगिंग साइटवर दररोज 10 ते 20 कोटी पोस्ट केल्या जातात. मात्र, यापैकी किती युजर्स रिअल आणि किती फेक आहेत, यावर मस्कने काहीही सांगितलेले नाही.

Elon Musk
New Smartphone: 200MP दमदार कॅमेरा, Honor 90 5G स्मार्टफोन 10 हजारांनी झाला स्वस्त; उद्यापासून सुरु होणार सेल...

दरम्यान, ट्विटर खरेदी करतानाही मस्कने या प्लॅटफॉर्मवरून फेक अकाउंट पूर्णपणे काढून टाकली जातील, असे आश्वासन दिलं होतं. त्याने कंपनीकडून रिअल आणि बॉट अकाउंटचा डेटाही मागवला होता. मात्र, आजपर्यंत फेक अकाउंट पूर्णपणे बंद करण्यासाठी कोणतीही पद्धत प्रभावी ठरलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com