Rama Ekadashi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Rama Ekadashi 2023: रमा एकादशीला करु नका या चुका, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Rama Ekadashi 2023 Tithi : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशीला रमा एकादशी म्हणून ओळखले जाते.

कोमल दामुद्रे

Diwali 2023 Tithi Date :

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशीला रमा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवसांपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा ही एकादशी ९ नोव्हेंबरला आहे. तसेच या दिवशी वसुबारस आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे.

या एकादशीला रंभा एकादशी असेही म्हटले जाते. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहाते. तसेच धनसंपत्ती आणि सर्व सुख प्राप्तीसाठी, विवाहात उशीर होत असल्यास हे व्रत केल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. रमा एकादशी शुभ मुहूर्त

  • आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी (Ekadashi) तिथी सकाळी ८ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ८.२३ पासून होईल तर ९ नोव्हेंबरला सकाळी १०.४१ वाजता संपेल.

  • रमा एकादशीचे व्रत - ९ नोव्हेंबर

2. रमा एकादशी पूजा मुहूर्त

  • एकादशी पूजेची शुभ वेळ (Time) - ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३९ ते ८.५० दरम्यान

  • एकादशी व्रताचे पारण- ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३९ ते ८.५० दरम्यान

3. रमा एकादशी व्रताच्या दिवशी हे नियम पाळा

  • एकादशीला चुकूनही भाताचे (Rice) सेवन करू नये

  • रमा एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये.

  • एकादशी व्रताच्या दिवशी तामसिक गोष्टींपासून दूर राहा.

  • जर तुम्ही एकादशी व्रत करत असाल तर खोटे बोलणे टाळा आणि कोणाचाही अनादर करू नका.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT