Raksha Bandhan Date 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Raksha Bandhan Date 2023 : ७०० वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

Raksha Bandhan Shubh Muhurt : भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन ही दोन दिवस साजरी केली जाणार आहे. यावेळी हा सण या 2 तारखेला म्हणजेच 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

कोमल दामुद्रे

Raksha bandhan Tithi 2023 Information In Marathi: श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. श्रावणातील दुसरा आणि महत्त्वाचा सण अर्थात रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. बहिण आणि भाऊ अतूट प्रेमाच्या रुपात हा सण साजरा केला जातो.

भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन ही दोन दिवस साजरी केली जाणार आहे. यावेळी हा सण या 2 तारखेला म्हणजेच 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? कोणत्या दिवशी भावाला राखी बांधायला हवी हे जाणून घेऊया. तसेच तब्बल ७०० वर्षांनंतर रक्षाबंधनाला पंचमहायोगाचा योगायोगही घडत आहे.

1. कोणत्या दिवशी भावाला राखी बांधावी?

पंचागानुसार श्रावणी (Shravan) पौर्णिमा ही 30 ऑगस्ट, बुधवारपासून सुरू होईल. परंतु, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०१ वाजेपर्यंत भद्राची सावली असणार आहे. भद्रकालमध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते. अशावेळी 30 ऑगस्ट रोजी रात्री 09:01 नंतरच राखी बांधण्याची योग्य वेळ (Time) आहे.

पंचागानुसार दिवसा राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते. त्यामुळे 31 ऑगस्ट 2023 ला राखी बांधणे शुभ राहील. 31 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7.05 पर्यंत असेल. कारण या दिवशी पौर्णिमा फक्त सकाळी 07.05 पर्यंत आहे.

2. राखी बांधण्याची योग्य पद्धत

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी (Rakhi) बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला बहिणीने राखी बांधावी, यामुळे भाऊ आणि बहिणीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. यासाठी आधी आंघोळ करून मग बहिणीने गणेशाला राखी बांधावी. यानंतर भावाचे डोके रुमालाने झाकून कपाळावर कुंकू, अक्षता लावा. भावाची आरती करा, तोंड गोड करा. त्याच्या मनगटावर रेशमी धाग्याची लाल, पिवळी किंवा हिरवी राखी बांधावी. त्यानंतर भाऊ बहिणीचे आशीर्वाद घेतो आणि तिला भेटवस्तू देतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT