Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाचा सण दरवर्षी येतो आणि या खास दिवशी भावा-बहिणीचे नाते आणखीन दृढ होते. प्रत्येक भावा-बहिणींचे एक वेगळं नातं पाहायला मिळते. भाऊ-बहिणीच्या नात्यात भांडणे होतात आणि खूप प्रेम असते, त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाला जर तुमच्या बहिणीला खूश करायचे असेल तर हे काही सरप्राईज गिफ्ट्स देण्यासाठी तुम्ही आधीच योजना करा.
बहिणीसाठी रक्षाबंधन खास कसे बनवायचे
रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी तिचा आवडता पदार्थ (Food) बनवू शकता. तुमच्या बहिणीने अनेकवेळा काहीतरी बनवून तुम्हाला खायला दिले असेल, पण यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ खायला देऊन आश्चर्यचकित करा. असे केल्याने तुमची बहिण खूप आनंदी होईल.
रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीसोबत मजेशीर उपक्रम आखू शकता. तुम्ही तुमच्या बहिणीसोबत गेम खेळायला जाऊ शकता. आजकाल मॉलमध्ये अनेक प्रकारचे गेम्स पाहायला मिळतात, जे तरुण पिढीला खूप आवडतात.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणीसोबत त्या ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता, जिथे तुम्ही तुमच्या लहानपणी एकत्र भेट दिली होती. अशा ठिकाणांना भेटी दिल्यास तुमचे बालपण आठवेल आणि पुन्हा एकदा नवीन आठवणीही जातील. तुम्ही कोठेही सरप्राईज ट्रिपची योजना आखत असाल, तर तुमच्या पालकांना सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा तुमच्या जुन्या दिवसांचा आनंद घेऊ शकाल.
रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीसोबत चित्रपट (Movie) पाहायला जाऊ शकता. तुम्ही चित्रपटाची तिकिटे आगाऊ बुक करा आणि मग तुमच्या बहिणीला थेट चित्रपटाच्या प्रदर्शनाला घेऊन जा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बहिणीसोबत तिचा आवडता जुना चित्रपटही घरी पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.