Railway PNR Status
Railway PNR Status Saam TV
लाईफस्टाईल

Railway PNR Status : WhatsApp वरुन मिनिटांत कळेल रेल्वेचे लोकेशन, फक्त PNR नंबरची गरज

कोमल दामुद्रे

Railway PNR Status : गावी जाताना किंवा लांबचा प्रवास करताना आपल्याला ट्रेन योग्य वेळी मिळणे गरजेचे असते. परंतु, कधी कधी ती उशिरा धावत असल्यामुळे आपण ठरवलेल्या गोष्टी या चुकतात. परंतु आता रेलॉफीने प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सोय केली आहे.

आता प्रवाशांना WhatsApp वरुन ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासता येणार आहे. मुंबईस्थित स्टार्टअप रेलॉफीने हे नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही WhatsApp वरुन तुमच्या प्रवासाची सर्व माहिती मिळवू शकाल. या एका फीचरच्या मदतीने युजर्सना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे अॅप्स डाउनलोड करावे लागणार नाहीत.

WhatsApp चे हे फीचर चॅटबॉक्सच्या मदतीने चालते. चॅटिंगद्वारे नंबर टाईप केल्यानंतरच ट्रेन आणि प्रवासासंबंधीची सर्व माहिती प्रवाशाला उपलब्ध होईल. इतकंच नाही तर IRCTC प्रमाणे WhatsApp यूजर्सना 139 हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. याच्या मदतीने एका स्टेशनला ट्रेनचे पहिले, येणारे स्टेशन आणि इतर तपशील मिळतील.

थेट ट्रेनची स्थिती कशी तपासायची

- सर्वप्रथम तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये Railofy चा WhatsApp चॅटबॉक्स नंबर +91-9881193322 सेव्ह करा.

- व्हाट्सएप ऍप्लिकेशन अपडेट करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.

- त्यानंतर तुम्ही फोनमध्ये सेव्ह केलेल्या Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.

- चॅट बॉक्समध्ये 10 अंकी PNR क्रमांक पाठवा.

- Railofy चॅटबॉट तुम्हाला रिअल टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील पाठवण्यास सुरुवात करेल.

- रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवता येतात.

IRCTC रेल्वे (Railway) प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील प्रदान करते. यासाठी प्रवाशांना फोनमध्ये IRCTC अॅप Zoop डाउनलोड करावे लागेल. या अॅपच्या मदतीने सीटवरच आवडते खाद्यपदार्थ मागवता येतात. अन्न (Food) ऑर्डर करण्याची ही प्रक्रिया आहे

- Zoop चा WhatsApp चॅटबॉट नंबर +91 7042062070 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.

- आता व्हॉट्सअॅपमध्ये Zoop चॅटबॉक्स विंडो उघडा.

- येथे तुमचा 10 अंकी PNR क्रमांक टाका आणि तुम्हाला जेथून जेवण ऑर्डर करायचे आहे ते येणारे स्टेशन निवडा.

- Zoop तुम्हाला चॅटबॉटवर रेस्टॉरंटची यादी दाखवेल. जेवण ऑर्डर करण्यासाठी या रेस्टॉरंटपैकी एक निवडा आणि तुमचे फूड बिल ऑनलाइन भरा.

- तुम्ही चॅटबॉक्सवर तुमच्या फूड ऑर्डरचाही मागोवा घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Solapur Lok Sabha Voting LIVE: दक्षिण सोलापुरात 'व्हीव्हीपॅट' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, अर्ध्या तासापासून मतदान थांबले

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT