5GMobile
5GMobileSaam Tv

5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? स्वस्त पण दमदार मोबाईल

ध्या भारतात लवकरच 5 G नेटवर्क येत आहे. त्याच अनुषंगाने भारतात नवनवे मोबाईल समोर येत आहेत.

मुंबई: सध्या भारतात लवकरच 5 G नेटवर्क येत आहे. त्याच अनुषंगाने भारतात नवनवे मोबाईल समोर येत आहेत. मोटोरोलाचा G सीरिज मधील एक नवा मोबाईल लॉंच होत आहे. पुढील महिन्यात ३ ऑक्टोबर रोजी भारतात हा मोबाईल लॉंच होणार आहे. सोबतच भारतात ऑक्टोबर महिन्यात Google Pixel 7 ही मोबाईल लॉंच होणार आहे. (Latest Marathi News)

5GMobile
Tech News: सिमकार्ड घेताना 'ही' चूक करु नका; अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरल्यास जाल तुरुंगात

Moto G72 च्या लॉंचच्या आधीच काही मोबाईलचे वैशिष्टे समोर आले आहे. हा नवा मोबाईल ग्राहकांना फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. परंतू अद्याप या मोबाईलच्या खरेदीची तारीख गुलदस्त्यातच आहे. त्यासाठी कदाचित ग्राहकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. Moto G72 या मोबाईलचे दोन कलर व्हेरियंटसमोर आले आहे. पहिला कलर Meteorite Grey आणि दुसरा कलर Polar Blue. (LIVE Marathi News)

5GMobile
WhatsApp : WhatsApp चे आणखी एक नवे बहुप्रतीक्षित फीचर; लवकरच घेऊ शकणार आनंद

याचे काही वैशिष्टे पुढीलप्रमाणे, या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सेंटर-अलाइन्ड पंच होल पोलेड डिस्प्ले असेल. याशिवाय फोनमध्ये 1,300nits पीक ब्राइटनेस, 10-बिट कलर, DCI-P3 कलर गॅमट आणि HDR10 सपोर्ट दिला जाईल. तसेच मोबाईलच्या डिस्प्लेवर फिंगरप्रिंट देण्यात आला असून IP52-रेट केलेले वॉटर-रिपेलेंटसाठी सपोर्ट आहे. (Breaking Marathi News)

5GMobile
मोबाईल, लॅपटॉप चार्ज होईल, मात्र बँक अकाऊंट होईल रिकामं! तुमच्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगार होतील मालमाल

Moto G72च्या मोबाईल संबंधित बोलायचे असल्यास 108-मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, एक अल्ट्रा-वाइड/डेप्थ सेन्सर आणि एक मॅक्रो कॅमेरा असलेल्या या मोबाईलमध्ये एकूण तीन कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये दोन स्पिकर्सही ग्राहकांना देण्यात आले आहे.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी मोटोरोला स्मार्टफोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येईल, 6GB LPDDR4X रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसोबत फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com