Railway Fact Saam tv
लाईफस्टाईल

Railway Fact : रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग म्हणजे काय? मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वाचा

How Up And Down Of Train Is Decided : तुम्ही नेहमीच रेल्वे स्थानकावरुन असा आवाज ऐकला असेल की, प्लॅटफॉर्म क्रमांक १ किंवा २ वर येणारी लोकल अप आणि डाउन मार्गावरुन येणार आहे. मात्र हे अप आणि डाउन मार्ग म्हणजे काय? जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

What Are Up And Down Railway Lines :

लाखो लोकांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला ओळखले जाते. सगळ्यात सोपी आणि सहजपणे प्रवास करता येणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे रेल्वे. काहींचा हा प्रवास रोजचा तर काहींना अगदी कंटाळवाणा वाटतो.

भारतीय रेल्वे (Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. लांबचा पल्ला गाठण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आपण रेल्वेचा पर्याय निवडतो. परंतु तुम्ही नेहमीच रेल्वे स्थानकावरुन असा आवाज ऐकला असेल की, प्लॅटफॉर्म क्रमांक १ किंवा २ वर येणारी लोकल अप आणि डाउन मार्गावरुन येणार आहे. मात्र हे अप आणि डाउन मार्ग म्हणजे काय? जाणून घेऊया.

भारतीय रेल्वे ही अनेक भागात विभागली आहे. एका विभागाला झोन असे म्हणतात. भारतात एकूण १८ झोन आहेत. या प्रत्येक झोनचे एक मुख्यालय आहे. त्यापैकी मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) - मुंबई (सी एस एम टी), पश्चिम रेल्वे (वेस्टर्न रेल्वे) - मुंबई (चर्चगेट), उत्तर रेल्वे (नॉर्थर्न रेल्वे) - नवी दिल्ली, कोकण रेल्वे - नवी मुंबई (बेलापूर). रेल्वेमध्ये दिशा दर्शवण्यापेक्षा अप आणि डाउनला अधिक महत्त्व आहे. अप आणि डाउनवरुन आपल्याला कळते की, रेल्वे तिच्या मूळ स्थानावरुन (होम स्टेशन किंवा स्टार्टिंग पॉइंट)येत आहे.

यामुळे रेल्वे नेमकी कुठून सुटते हे कळण्यास मदत होते. रेल्वेचे पहिले आणि शेवटचे दोन्ही स्टेशन हे त्याचे सुरुवातीचे बिंदू आहेत. परंतु या स्थानांपैकी एक हे त्याचे मूळ केंद्रबिंदू मानले जाते.

1. अप आणि डाउन मार्ग म्हणजे काय?

ज्या ठिकाणाहून रेल्वे निघते ते मुख्य स्थानक म्हणजे अप तर त्या उलट सुटणाऱ्या रेल्वे या डाउन मार्गावर जातात. डाउन म्हणजे विटी किंवा चर्चगेटवरुन सुटणाऱ्या रेल्वे तर अप म्हणजे विटी किंवा चर्चगेटला येणाऱ्या रेल्वे.

कोणत्याही मोठ्या स्टेशनवरुन किंवा टर्मिनसपासून दूर जाणारी ट्रेन ही डाउन मार्ग म्हणून ओळखली जाते. उदा. सीएसटीएमवरुन सुटणारी ट्रेन कल्याण मार्गे जात असेल तर ती डाउन मार्ग असते. याउलट कल्याणवरुन सीएसटीएमला येणारी रेल्वे ही अप मार्ग म्हणून ओळखली जाते. कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वेवर N हे अक्षर दर्शविले जाते. तर कर्जतला जाणाऱ्या रेल्वेवर S हे अक्षर वापरलेले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT