Murud Janjira Touris Saam TV
लाईफस्टाईल

Murud Janjira Tourism : चारही बाजूने विशाल समुद्र अन् मध्ये किल्ला; मुरुड जंजिराचं सौंदर्य पाहून वास्तुच्या प्रेमात पडाल

Raigad Famous Tourist Places : मुरुड जंजिरा किल्ला पावसाची एकूण परिस्थिती पाहता २५ सप्टेंबरपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

रायगडमधील मुरुड येथे वसलेला जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येथे दाखल होतात. किल्ल्याच्या चारही बाजूंनी फेसळणाऱ्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या किल्ल्याचे सौंदर्य आणखी खुलते. सध्या पावसाळा सुरू असल्याने हा किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. मात्र या महिन्याच्या अखेरीस हा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

25 सप्टेंबरपासून जंजिरा जलदुर्ग खुला होणार?

मुरुड जंजिरा पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी बुधवारी जंजिरा पर्यटकांसाठी पुन्हा केव्हा सुरू होणार याबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, पावसामुळे या जलदुर्गावर ठिकठिकाणी झाडी वाढली आहे. तसेच चारही बाजूने खवळलेला समुद्र आहे. त्यामुळे येथे काही सरपटणारे प्राणी सुद्धा आहेत. यात काही विषारी आणि काही बिनविषारी सापांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे साफसफाई करावी लागणार आहे.

जर पाऊस कमी झाला आणि किल्ल्यात जाण्यासाठी अनुकूल वातावरण असले तर लगेचच 25 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी तो खुला केला जाऊ शकतो. तसेच अनुकूल वातावरण असल्यास 25 तारखेआधी देखील हा किल्ला पर्यटकांसाठी खुला होऊ शकतो, असंही मुरुड जंजिरा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.

मुंबईहून मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठीचा मार्ग

मुंबई ते मुरड जंजिरा किल्ला हे अंतर 151.6 किलोमिटर इतकं आहे. तुम्ही बाय रोड प्रवास केला तर येथे पोहचण्यासाठी तुम्हाला 3 तास 40 मिनिटे इतका वेळ लागेल.

मुंबई ते मुरड जांदिरा ट्रेन प्रवास

मुंबईहून तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर आधी पनवेल स्थानकात जावे लागेल. त्यानंतर रोहासाठी जाणारी ट्रेन पडका. रोहाला उतरल्यावर येथून तुम्हाला मुरड जंजिरा किल्ल्याला जाण्यासाठी काही बस किंवा रिक्षा मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही येथे पोहचू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल होणार आमदार? पाहा Exit Poll

Pune Crime: पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरला, १४ वर्षीय पोराचं धक्कादायक कृत्य

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

SCROLL FOR NEXT