PVR Inox, PVR Inox Unique Features  Saam Tv
लाईफस्टाईल

PVR Inox : पीव्‍हीआर आयनॉक्‍सकडून मनोरंजन प्रेमींना मिळणार सबस्क्रिप्शन, ३४९ रुपयात पाहाता येणार ४ चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PVR Inox Passport :

पीव्‍हीआर आयनॉक्‍स लि. या भारतातील सर्वात मोठ्या मल्‍टीप्‍लेक्‍स कंपनीने त्‍यांचे मासिक सिनेमा सबस्क्रिप्‍शन सेवा पासपोर्टचे दुसरे एडिशन लाँच केले आहे. हा पासपोर्ट ग्राहकांकडून मिळालेल्‍या बहुमूल्‍य अभिप्रायानंतर रिडिझाइन करण्‍यात आला आहे.

आता दक्षिण भारतीय राज्‍यांसह संपूर्ण देशामध्‍ये उपलब्‍ध असलेला हा सुधारित पासपोर्ट अधिक युजर-अनुकूल आहे आणि त्‍यामध्‍ये उत्‍साहवर्धक नवीन वैशिष्‍ट्ये व काही अटींची भर करण्‍यात आली आहे. १८ मार्चपासून सबस्‍क्रायबर्स किफायतशीर दरामध्‍ये चित्रपट (Movie) पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतील.

सोमवार ते गुरूवार सबस्‍क्रायबर्स प्रतिमहिना फक्‍त ३४९ रूपयांमध्‍ये ४ चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. सबस्‍क्रायबर्सना पासपोर्टच्‍या माध्‍यमातून इतरांसाठी तिकिटे खरेदी व रिडिम करण्‍याचा पर्याय देखील आहे. सबस्‍क्रायबर्सची रिक्‍लायनर्सवर किंवा आयमॅक्‍स, पी(एक्‍सएल), आयसीई, स्क्रिनएक्‍स, एमएक्‍स४डी किंवा ४ डीएक्स अशा प्रीमियम व एक्‍स्‍पेरिएन्शियल फॉर्मेट्समध्‍ये चित्रपट पाहण्‍याची इच्‍छा असेल तर ते पासपोर्ट कूपन व्‍यतिरिक्‍त १५० रूपये (Price) व त्‍यापेक्षा अधिक अतिरिक्‍त शुल्‍क भरू शकतात आणि मनोरंजनाचा आनंददायी अनुभव घेऊ शकतात. पण, हे वैशिष्‍ट्य दक्षिण भारतीय (India) बाजारपेठांमध्‍ये उपलब्‍ध नसेल.

चित्रपटप्रेमी पीव्‍हीआर व आयनॉक्‍स अॅप किंवा वेबसाइटवर आणि पेटीएमच्‍या माध्यमातून पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्ट २.० प्राप्‍त करू शकतात. सबस्‍क्रायबर्सना एकूण १०४७ रूपये भरून ३ महिन्‍यांचे सबस्क्रिप्‍शन खरेदी करण्‍याचा पर्याय देखील असेल, ज्‍यामध्‍ये त्‍यांना ३५० रूपयांचे फूड वाऊचर्स मिळतील. यावेळी फक्‍त ५०,००० पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्टस् उपलब्‍ध असल्‍यामुळे चित्रपटप्रेमींनो अद्वितीय सिनेमॅटिक अनुभवासाठी लवकरात लवकर हा पासपोर्ट मिळवा.

पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्ट २.० च्‍या लाँचबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत पीव्हीआर आयनॉक्‍स लि.चे उप-मुख्‍य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्‍हणाले, ''आमच्‍या पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्टच्‍या पहिल्‍या एडिशनवर चित्रपटप्रेमींकडून प्रेम व कौतुकांचा भरपूर वर्षाव झाला.

आम्‍ही देशभरातील चित्रपट पाहणाऱ्यांसाठी क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याकरिता या पासपोर्टच्‍या क्षमतांना कशाप्रकारे सर्वोत्तम करू शकतो यासंदर्भात वापरकर्त्‍यांकडून अनेक अभिप्राय मिळाले. आम्‍हाला आता नवीन व्‍हर्जन निर्माण केल्‍याचा अभिमान वाटत आहे, जे अत्‍यंत ग्राहक अनुकूल आहे, किमतीसंदर्भातील आव्‍हानांवर मात करते.

ज्‍यामुळे आम्‍हाला देशातील चित्रपट पाहण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणता आला आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक शैलींमधील अधिकाधिक कन्‍टेन्‍टचा आनंद देण्‍यासह यासारख्‍या तत्त्वामध्‍ये चित्रपटांसाठी प्रौढ किंवा लहान प्रेक्षकांचे वेधून घेण्‍याची क्षमता आहे.''

गौतम पुढे म्‍हणाले, ''यावेळी, पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्ट दक्षिणेकडील राज्‍यांमध्‍ये देखील उपलब्‍ध असणार आहे, ज्‍यामुळे निश्चितच भारतभरातील सर्व प्रेक्षकांना या पासपोर्टचा आनंद घेता येईल. आम्‍हाला पीव्‍हीआर आयनॉक्‍स पासपोर्टसाठी व्‍यापक पूर्व-नोंदणींसह खूप प्रेम व उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्‍ही तुम्‍हाला चित्रपट वारंवार पाहण्‍याचा आनंद घेताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.''

सर्वोत्तम लाइन-अपसह पासपोर्ट असलेल्‍या सबस्‍क्रायबर्सना आगामी महिन्‍यांमध्‍ये किफायतशीर दरामध्‍ये अनेक कन्‍टेन्‍ट निवडी उपलब्‍ध असतील. बहुप्रतिक्षित टायटल्‍समध्‍ये सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे, जसे 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'पुष्‍पा २', 'सिंघम अगेन', 'मैदान', 'जिगरा', 'वेलकम टू द जंगल' आणि 'स्‍त्री २'. हॉलिवुड चित्रपट लाइनअपमध्‍ये बहुप्रतिक्षित टायटल्‍सचा समावेश आहे, जसे 'गॉडझिला x काँग: द न्‍यू एम्‍पायर', 'द फॉल गाय', 'फ्युरोसिया: ए मॅड मॅक्‍स सागा', 'डेडपूल अँड वोल्‍वेरिन', 'किंग्‍डम ऑफ द प्‍लॅनेट ऑफ द अॅपीस' आणि 'ए क्‍वाइट प्‍लेस: डे वन'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT