puffy eyes morning cause saam tv
लाईफस्टाईल

Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

puffy eyes morning cause: सकाळी डोळ्यांभोवती सूज दिसतेय? डॉक्टरांच्या मते ही किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत आणि त्याची कशी काळजी घ्यावी हे पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या आयुष्यात सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसणं ही अनेकांना साधी गोष्ट वाटते. पण डॉक्टरांच्या मते, हीच छोटी वाटणारी लक्षणं अनेकदा मोठ्या आजाराची सुरुवात असू शकतात. यामध्ये किडनीशी संबंधित समस्या असेल तर त्याची पहिले संकेत डोळ्यांभोवतीची सूज दिसून येतात.

डोळ्यांभोवती सूज म्हणजे किडनीचा इशारा?

सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले दिसणं याला वैद्यकीय भाषेत 'पेरिऑर्बिटल पफीनेस' म्हणतात. ही स्थिती त्यावेळी निर्माण होते जेव्हा किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होऊ लागते. किडनीमधील नेफ्रॉन नीट काम करत नाहीत, तेव्हा शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर जाऊ लागतं. अशावेळी अल्ब्युमिन हे महत्त्वाचं प्रोटीन कमी होतं. हे प्रोटीन शरीरात पाणी योग्य ठिकाणी ठेवण्याचं काम करतं. जेव्हा ते कमी होतं तेव्हा शरीरातील द्रव टिश्यूमध्ये साचू लागतो आणि त्यामुळे चेहरा आणि डोळ्यांभोवती सूज दिसते.

सकाळीच सूज जास्त का दिसते?

रात्री झोपताना आपण सरळ झोपतो, त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील द्रव पदार्थ चेहऱ्याजवळ विशेषतः डोळ्यांच्या खाली साचतो. म्हणून सकाळी उठल्यावर सूज जास्त दिसून येते. जसजसा दिवस पुढे जातो तसतसं हेच द्रव पायांकडे आणि घोट्यांकडे सरकतो. यामुळे डोळ्यांवरील सूज कमी झाल्यासारखी वाटते.

इतर कारणं कोणती आहेत?

डोळ्यांभोवती सूज येण्यामागे फक्त किडनीचं कारण नसतं. अनेकदा झोप पूर्ण न होणं, अॅलर्जी, जास्त मीठ खाणं किंवा शरीरात पाण्याची कमतरता यामुळेही ही समस्या दिसू शकते. पण ही सूज सतत राहतेय आणि त्यासोबत काही इतर लक्षणंही जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नये.

काळजी कोणी घ्यावी?

ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांचं ब्लड शुगर वाढलेल असतो किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास आहे अशा लोकांनी डोळ्यांभोवती आलेली सूज अजिबात दुर्लक्षित करू नये. कारण त्यांच्यासाठी ही लक्षणं किडनीच्या आजाराची सुरुवात असू शकते. किडनीचा संबंध हृदय आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणाशीही असतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT