Hair Fall Reasons Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Fall Reasons: 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे गळतात अधिक केस, जाणून घ्या

काळे, दाट आणि सुंदर केस कोणाला नकोत ?

कोमल दामुद्रे

Hair Fall : हल्ली बदलेल्या जीवनशैलीनुसार केसगळतीची समस्या प्रत्येक वयोगटामध्ये दिसत आहे. केसगळतीमुळे सगळेच जण त्रस्त दिसून येतात. काळे, दाट आणि सुंदर केस कोणाला नकोत, पण आजकाल केसगळतीची समस्या अनेकांना भेडसावत आहे, विशेषत: तरुण-तरुणी टक्कल पडण्याच्या समस्येला बळी पडत आहेत. केस गळणे सामान्य झाले आहे. त्यामागे धूळ, घाण, सूर्यप्रकाश आणि प्रदूषण असू शकते.(Hair Fall Reasons)

कारण घाणीमुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात, पण कधी कधी आपल्या आहारातील चुकांमुळे केस गळतात. तुम्हालाही या केसगळतीपासून मुक्ती हवी असेल तर या स्टेप्स फॉलो करा

1. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळतात

ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी ZEE NEWS ला सांगितले की, शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे केस कमकुवत होतात आणि वेगाने गळू लागतात. या पोषक तत्वांद्वारे तुम्हाला अंतर्गत पोषण मिळाल्यास केस गळण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते

2. प्रथिने महत्वाचे का आहे?

शरीर, स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी आपण सहसा प्रथिनेयुक्त आहार घेतो, परंतु आपल्याला कदाचित माहित नसेल की या पोषक तत्वांच्या कमतरतेचा आपल्या केसांवर देखील वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

Hair Fall Reasons

3. प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे

प्रथिनांच्या कमतरतेची चिन्हे योग्य वेळी ओळखली तर तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. सामान्यतः अशा परिस्थितीत तुमचे केस अचानक वाढणे बंद होते आणि त्याच वेळी नखे देखील कमकुवत होतात आणि सहजपणे तुटतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो, तसेच कमकुवतपणामुळे शरीरात वेदना होतात. ही चिन्हे ओळखून प्रथिनेयुक्त आहाराचे सेवन वाढवा.

4. प्रथिने मिळविण्यासाठी या गोष्टी खा

1. मसूर

2. अंडी

3. सुकी फळे

4. शेंगदाणे

5. मासे

6. दूध

7. सोयाबीन

8. चीज

9. चिकन

10. मांस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT