Eggs
Eggs saam tv
लाईफस्टाईल

Eggs Shortage : कडाक्याच्या थंडीत अंड्यांचे दर गगनाला भिडले; दिवसाला १ कोटी अंड्यांचा तुटवडा

Ruchika Jadhav

Eggs Shortage News: महाराष्ट्रात सध्या थंडी जास्त प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थंडीला पाहता आता अनेक व्यक्ती अंडी खाण्यावर भर देत आहेत. मात्र या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मागणी वाढली असली तरी अंड्यांच शॉर्टेज झालं आहे. सुमारे एक कोटी अंडी बाजारात कमी येत आहेत. पशुसंवर्धन विभागाने या बाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय पारकाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडीमुळे अंडी खाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पशुसंवर्धन विभाग वाढत असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी असक्षम ठरले आहे. सध्या राज्यात २.२५ कोटी अंड्यांची गरज भासत आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्मसना अंड्यांचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांतून अंडी मागवली जात आहेत.

मागणीत वाढ आणि उत्पादनात घट झाल्याने अंड्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर याचा फटका बसत आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाने पोल्ट्री फार्म व्यावसायिकांसाठी अनुदान स्वरूपात ५० पांढऱ्या लेघोर्न कोंबड्या आणि १००० पिंजरे म्हणजे एकूण २१ हजारांचे अनुदान देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे.

औरंगाबादसह अन्य शहरांमध्ये अंड्यांच्या किंमती वाढत आहेत. सध्या १०० अंडी ५७५ रुपये दराने घाऊक बाजारात विकली जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे दर वाढत चालले आहेत. ५७५ पासून ६०० पर्यंत दर वाढले आहेत. पुढे अंड्यांचा तुटवडा असाच कायम राहिल्यास अंडी आणखीन महागण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने वर्तवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडणार; अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

Cholesterol Levels : हाय कोलेस्ट्रॉलमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक;आजपासूनच आहारात या पदार्थांचा समावेश करा

Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

SCROLL FOR NEXT