Pregnancy Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Tips : तुमची गर्भधारणा अवघड की, सोपी ? महिलांमध्ये असणारी 'ही' पाच लक्षणे प्रजनन क्षमतेचं कार्य ठरवणार !

आपल्या प्रजनन क्षमतेवरुन कळेल गर्भधारणा अवघड की, सोपी

कोमल दामुद्रे

Pregnancy Tips : बदलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयीमुळे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. ज्यामुळे स्त्रियांना गरोदर (Pregnancy) राहाण्यासाठी अधिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

त्याच वेळी, काही स्त्रिया अशा आहेत ज्या अगदी सहजपणे गर्भवती होतात. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला त्या लक्षणांबद्दल सांगत आहोत जे सांगतात की तुमच्या प्रजननांची क्षमता किती आहे.

१. तुमचे वय २० ते २५ असेल तर

रिचर्स केल्यानंतर असे कळाले की, २० ते २४ वर्षाच्या मधील मुलींची प्रजनन क्षमता ही सगळ्यात चांगली असते. परंतु, प्रजनन क्षमता ही प्रत्येक महिलेसाठी (Women) सारखी नसते. यात बरेच बदलही असतात.

२. मासिक पाळी नियमित येणे

कधी कधी मासिक पाळीचे चक्र हे चुकते, ज्यामुळे आपल्याला अधिक चिंता वाटू लागते. परंतु, काही महिलांच्या मध्ये हे चक्र महिन्याला महिन्या व्यवस्थितरित्या येत असेल तर हे प्रजनन क्षमतेसाठी चांगले असते.

३. आनुवंशिकता

जेव्हा केव्हाही प्रग्नेंसीच्या गोष्टी आपण ऐकतो तेव्हा आपल्याला भीती किंवा चिंता वाटू लागते. परंतु, याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण असते आनुवंशिकता.

४. योनीतून स्त्राव

जर मासिक पाळीच्या मध्यभागी योनीतून स्पष्ट, गंधहीन ग्रीवाच्या श्लेष्माचा स्त्राव होत असेल, तर ते एक चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा की, तुमची गर्भाशय ग्रीवा शुक्राणूंना सहजपणे हलवण्यास आणि रोपण करण्यास मदत करते आणि ही गर्भधारणा सुरुवातीच्या टप्प्यासाठी खूप महत्वाचे आहे.

५. पीएमएस (प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम) ची लक्षणे

मनःस्थिती बदलणे, वारंवार खाण्याची इच्छा होणे, खालच्या ओटीपोटात दुखणे, थकवा, चिडचिडेपणा आणि नैराश्य ही पीएमएसची लक्षणे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोममध्ये आहेत. मासिक पाळीत दर चारपैकी तीन महिलांना यापैकी काही लक्षणे जाणवतात. तुम्हाला कदाचित ही स्थिती आवडणार नाही पण हे प्रजनन क्षमतेचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की, तुमच्या शरीराला हवे तसे ते कार्य करेल अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT