Pregnancy infections SAAM TV
लाईफस्टाईल

Pregnancy infections: गर्भधारणेत संसर्ग टाळायचा? आई-बाळाच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या सोपे उपाय

Common infections during pregnancy: गर्भधारणेदरम्यान होणारे सामान्य संसर्ग, त्यांची लक्षणं, बाळावर होणारा परिणाम आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या. यासाठी तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्यात त्या पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात बहुतेक महिलांना संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. शिवाय, गर्भधारणेदरम्यान काही संसर्गाची स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. वेळीच जनजागृती आणि प्रतिबंधाने आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण करता येतं. गर्भधारणेदरम्यान सामान्य संसर्ग आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अदिती सिंघी यांनी सांगितलं की, गर्भधारणा हा त्या महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि नाजूक असा टप्पा आहे. बहुतेक महिला त्यांच्या गर्भधारणेदरम्यान केवळ पोषण आणि नियमित तपासणीवर लक्ष केंद्रित करतात, परंतु गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या संसर्गाकडे मात्र त्या दुर्लक्ष करतात. आईमध्ये काही संसर्गांची केवळ सौम्य लक्षणं दिसू शकतात परंतु त्याचे वेळीच निदान न झाल्याने बाळाच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात.

नियमित तपासणी, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यास गर्भधारणेशी संबंधित संसर्ग टाळता येऊ शकतात आणि सुरक्षित व निरोगी गर्भधारणा अनुभवता येते.

गर्भधारणेदरम्यान होणारं सामान्य इन्फेक्शन

युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन

गर्भधारणेदरम्यान होणारं सामान्य इन्फेक्शन ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणं, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणं किंवा ओटीपोटात वेदना अशी लक्षणं आढळतात. महिलांनी ही लक्षणं सहन करू नये. लक्षात ठेवा की जर वेळीच उपचार केले नाहीत तर ते किडनीचं इन्फेक्शन आणि अकाली प्रसूतीचा धोका असतो.

योनीमार्गाचं इन्फेक्शन

यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस सारख्या समस्येमुळे खाज सुटणं, योनीमार्गाद्वारे स्त्राव आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते ज्यामुळे एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास या संसर्गांमुळे अकाली जन्माचा धोका वाढू शकतो.

श्वसनमार्गाचं संक्रमण

फ्लू, सर्दी आणि इतर श्वसनमार्गाचं इन्फेक्शन गर्भधारणेत व्यत्यय निर्माण करू शकतात. अनेक महिलांना ताप येऊ शकतो. जो दीर्घकाळ राहिल्यास बाळासाठी हानिकारक ठरतो. म्हणून वेळीच सावधगिरी बाळगा.

टॉर्च (TORCH) इन्फेक्शन

यामध्ये टॉक्सोप्लाज्मोसिस, रुबेला, सायटोमेगॅलव्हायरस आणि हर्पिस यांचा समावेश आहे. गर्भधारणेदरम्यान आईला संसर्ग झाल्यास ते बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करू शकतात.

हेपेटायटीस बी आणि सी

बाळंतपणादरम्यान हेपेटायटीस बी आणि सी यांचं योग्यरित्या मॅनेजमेंट केलं नाही तर ते आईकडून बाळाकडे संक्रमित होऊ शकतं. म्हणूनच वेळीच डॉक्टरांची मदत घ्या. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

या टिप्स फॉलो करा

गर्भवती महिलांनी या संसर्गांबद्दल जागरूक असले पाहिजे. त्यांनी तज्ञांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करावी, चांगली वैयक्तिक स्वच्छता राखावी, कोणतेही रसायनयुक्त पदार्थ वापरू नयेत, हायड्रेटेड राहावं आणि पुरेसं पाणी प्यावं, घरी शिजवलेलं अन्न खावं, कच्चं किंवा कमी शिजलेल्या पदार्थांचे सेवन टाळावं, वारंवार हात धुवावेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १२ वर्षांपूर्वीचे नियम केले पुन्हा लागू; पेन्शन वाढण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा धक्कादायक निर्णय; सोडली तीन खात्यांची धुरा|VIDEO

Arbaaz Khan : मोजके सिनेमे करूनही अरबाज खान मालामाल; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, सलमानच्या भावाचा स्वॅगच भारी

Eye Dark Circle Removal Tips: डोळ्याखालची काळी वर्तुळे कशी घालवायची?

SCROLL FOR NEXT