Thane Pre Wedding Places  Saam TV
लाईफस्टाईल

Thane Pre Wedding Places : ठाण्यातील प्री वेडिंग फोटोशूटसाठी रोमँटिक प्लेस; मनसोक्त फोटो काढा

Pre Wedding Places Tours in Thane : तुमचं सुद्धा यंदा कर्तव्य आहे आणि प्री वेडिंग फोटोशूटसाठी रोमँटिक जागा शोधत आहात? तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी आणली आहे.

Ruchika Jadhav

लग्न म्हटलं की आताच्या काळात प्री वेडिंग फोटो आलेच. प्रतेक जोडपं लग्नाआधी आपल्या खास क्षणांना कॅमेऱ्यात कैद करतात. विविध ठिकाणी भेट देत फोटोशूट करतात. प्री वेडिंग फोटोशूटची सध्या क्रेझ सुरू आहे. आता तुमचं सुद्धा यंदा कर्तव्य आहे आणि प्री वेडिंग फोटोशूटसाठी रोमँटिक जागा शोधत आहात? तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी आणली आहे.

ओवळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन

तुम्ही मुंबई किंवा ठाणे येथे राहत असाल तर हे गार्डन तुमच्यासाठी बेस्ट आहे. येथे फुलपाखरांसह तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करू शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यावर घोडबंदर रोडसाठी बस करावी लागेल. त्यानंतर तुम्ही ओवळेकर वाडीमधील हे गार्डन गाठू शकता.

भातसा डॅम

तुम्हाला बोरिंग फोटोशूट नको असेल काही तरी हटके पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही भातसा धरणावर जाऊ शकता. येथे मुलगी साडीमध्ये आल्यास भन्नाट फोटोशूट होत. शहापूर रेल्वे स्थानकात उतरून तुम्ही येथे पोहचू शकता.

गैमुख चौपाटी

गैमुख चौपाटी सुद्धा अतिशय रोमँटिक प्लेस आहे या चौपाटीला भेट देण्यासाठी तुम्ही ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यावर गैमुख गावात रिक्षा किंवा बसने पोहचू शकता. या गावातच गैमुख चौपाटी आहे.

विवियाना मॉल

विवियाना मॉल ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक कपल येथे फिरण्यासाठी आणि कॉलिटी टाईम स्पेंड करतात. तुम्ही ठाणे स्थानकात आल्यावर या मॉलसाठी रिक्षा किंवा बस करू शकता. तुम्हाला क्लासी लूकमध्ये फोटोशूट करायचे असेल तर येथे येऊ शकता.

येरू हिल्स

ट्रेकिंगची आवड असल्यास तुम्ही येथे भेट देऊ शकता. तसेच नॉर्मल फोटोशूट ऐवजी तुम्ही ट्रेकिंग करत फोटोशूट करू शकता. येथे कपल्स फोटो फार छान येतात. येथे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला ठाणे रेल्वे स्थानकातून रिक्षा किंवा बस मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT