रात्री उशीरा झोपल्यास आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो
योग्य वेळी घेतलेला पॉवर नॅप दिवसभराचा थकवा कमी करून तुम्हाला फ्रेश ठेवते
पॉवर नॅपमुळे एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल, सतत जांभया येत असतील किंवा कामात लक्ष लागत नसेल तर काही मिनिटांची छोटीशी झोप तुम्हाला फ्रेश करू शकते. या छोट्या झोपेला 'पॉवर नॅप' (Power Nap) असे म्हणतात. आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण दुपारी थोडा वेळ झोप घेणे पसंत करतात. मात्र, पॉवर नॅप किती वेळ घ्यावी? १०, २० की ३० मिनिटे? योग्य पद्धत काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने पॉवर नॅप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
पॉवर नॅप म्हणजे दिवसभरातील थकवा कमी करण्यासाठी घेतलेली कमी वेळेची झोप. ही झोप साधारणपणे १० ते २० मिनिटांची असते. रात्रीची पूर्ण झोप घेण्याऐवजी दिवसा काही मिनिटे विश्रांती घेऊन शरीर आणि मेंदूला पुन्हा सक्रिय करण्याचा हा एक मार्ग आहे. पॉवर नॅपमुळे मानसिक थकवा कमी होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि कामातील कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. विशेषतः दुपारच्या वेळी आळस किंवा झोप येत असल्यास छोटीशी डुलकी फायदेशीर ठरू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पॉवर नॅप साधारण १० ते २० मिनिटे घेणे फायदेशीर ठरते.
१० मिनिटांची पॉवर नॅप
जर तुम्हाला खूप वेळ झोपण्यासाठी वेळ नसेल तर १० मिनिटांची छोटी डुलकी घेऊ शकता. यामुळे शरीराला थोडी विश्रांती मिळते. थकवा आणि सुस्ती कमी होण्यास मदत होऊ शकते. कामाच्या मधल्या वेळेत फ्रेश होण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
२० मिनिटांची पॉवर नॅप
२० मिनिटांची पॉवर नॅप अनेकांसाठी योग्य मानली जाते. या वेळेत साधारण हलकी झोप मिळते. त्यामुळे उठल्यानंतर अधिक ताजेतवाने वाटू शकते. एकाग्रता, सतर्कता आणि काम करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.
३० मिनिटांची पॉवर नॅप
३० मिनिटांची झोप काही लोकांसाठी फायदेशीर असली तरी प्रत्येकासाठी ती योग्य असेलच असे नाही. या कालावधीत काहीजण गाढ झोपेच्या टप्प्यात प्रवेश करू शकतात. त्यामुळे उठल्यानंतर काही वेळ डोके जड वाटणे, आळस येणे किंवा सुस्ती जाणवू शकते. याला Sleep Inertia असे म्हणतात. त्यामुळे दिवसा झोप घेतल्यानंतर लगेच कामाला लागायचे असल्यास १० ते २० मिनिटांची झोप अधिक योग्य ठरू शकते.
पॉवर नॅप घेण्यासाठी दुपारची वेळ अधिक योग्य मानली जाते. साधारण दुपारी १ ते ३ या वेळेत छोटी डुलकी घेऊ शकता. या काळात अनेकांना नैसर्गिकरीत्या झोप येते.मात्र, संध्याकाळी उशिरा किंवा रात्रीच्या झोपेच्या अगदी जवळ पॉवर नॅप घेणे टाळावे. त्यामुळे रात्री झोप लागण्यास अडचण येऊ शकते.
झोपण्यासाठी शक्यतो शांत, आरामदायी आणि कमी प्रकाश असलेली जागा निवडा.
१० ते २० मिनिटांचा अलार्म लावा, जेणेकरून जास्त वेळ झोप होणार नाही.
झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळा.
शरीराला आराम मिळेल अशा स्थितीत झोप घ्या.
झोपेतून उठल्यानंतर थोडे पाणी प्या आणि शरीराला सक्रिय होण्यासाठी काही मिनिटे द्या.
दिवसा ३० ते ६० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झोपल्यास काही लोकांना उठल्यानंतर सुस्ती जाणवू शकते. तसेच उशिरा घेतलेली किंवा दीर्घकाळ चालणारी डुलकी रात्रीच्या झोपेच्या वेळापत्रकावर परिणाम करू शकते. जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल, वारंवार झोपमोड होत असेल किंवा निद्रानाशाचा त्रास असेल तर दिवसा झोपण्याचा कालावधी आणि वेळ याकडे विशेष लक्ष द्यावे.
दिवसभर काम केल्यामुळे मेंदूवर ताण येतो. छोटीशी डुलकी घेतल्याने मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते.
पॉवर नॅपमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि सतर्कता सुधारू शकते.
पुरेशी विश्रांती मिळाल्याने चिडचिड आणि थकवा कमी होऊन मूड चांगला राहण्यास मदत होते.
दिवसा घेतलेली छोटी झोप माहिती लक्षात ठेवण्याच्या प्रक्रियेला आणि स्मरणशक्तीला मदत करू शकते.
थकवा कमी झाल्यामुळे काम करताना अधिक उत्साह आणि ऊर्जा जाणवू शकते.
विशेषतः दुपारच्या वेळी येणारी झोप आणि सुस्ती कमी करण्यास मदत होते.
काही मिनिटांच्या झोपेमुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.