Post COVID-19 Diet SaamTv
लाईफस्टाईल

Post COVID-19 Diet Tips: कोरोनातून बरे झाल्यावर 'ही' चूक करु नका...

कोरोनामुळे शरीराला अनेक नुकसान होतात. यातून बरे झाल्यानंतरही अनेक महिने त्याचा प्रभाव कायम राहतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनामुळे शरीराला अनेक नुकसान होतात. यातून बरे झाल्यानंतरही अनेक महिने त्याचा प्रभाव कायम राहतो. कोरोनामुळे शरीराचे असे अनेक नुकसान होत आहे ज्यातून सावरणे शक्य नाही. पोस्ट कोव्हिड रिकव्हरीबद्दल बोलताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काहींना दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत आहे, तर काहींना भूक न लागणे, केस गळणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत योग्य आहार न घेतल्याने समस्या आणखी वाढू शकते (Post COVID-19 Diet Tips Do Not Have These Food During Corona Recovery Period).

आहाराची काळजी घेणे महत्त्वाचं

संशोधनानुसार, अनेक वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही लक्षणे 68 दिवस टिकतात. संसर्ग निघून गेल्यावरही शरीराला पूर्वीच्या स्थितीत येण्यास वेळ लागतो. यासाठी चांगला आहार (Diet) आणि उत्तम जीवनशैली पाळणे आवश्यक आहे. अन्यथा, कोव्हिड (COVID-19) मधून बरे होऊन बराच काळ लोटल्यानंतरही व्यक्तीला अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशा वेळी तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

काय काळजी घ्यावी -

💠कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर काही महिने बाहेरचे अन्न (Food) खाणे टाळावे. बाहेरील अन्न शिळे असू शकते, त्यात अनेक रंग, रसायने किंवा भेसळयुक्त गोष्टी असू शकतात, ज्यामुळे रिकव्हरी स्टेजमध्ये तुमचे नुकसान होऊ शकते.

💠तसेच, पॅकेज फूड खाणे टाळावे. ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल्स टाकले जातात. हे प्रक्रिया केलेले पदार्थ तुम्हाला खूप नुकसान देऊ शकतात.

💠कुकीज, केक, चॉकलेट्स, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले फळांचे रस किंवा भरपूर साखर असलेल्या गोष्टी खाऊ नका. कोव्हिड दरम्यान दिलेल्या औषधांमुळे अनेकांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे. अशा परिस्थितीत जास्त साखर असलेल्या गोष्टी खाणे खूप हानिकारक ठरू शकते.

💠घरातील हलकेच अन्न खा. फक्त ताजे अन्न घ्या.

💠ट्रान्स फॅट प्रोडक्ट जसेकी डालडा, फ्रोझन पिझ्झा, तळलेले अन्न, समोसे इत्यादी खाणे टाळा. जे अन्न सहज पचते तेच खा.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Fall: धनत्रयोदशीपासून सोन्याचे दर घसरले, तब्बल ७६०० रूपयांनी झालं स्वस्त; वाचा सविस्तर

Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल

Breathing Problems: रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतोय अन् वजनही वाढतंय? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

How To Remove Negativity: घरात दारिद्र्य आणतात या ४ गोष्टी, आजच घराबाहेर काढा

SCROLL FOR NEXT