Poco C55 Smartphone
Poco C55 Smartphone Saam Tv
लाईफस्टाईल

Poco C55 Smartphone : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह10 हजारांच्या आत Poco C55 लॉन्च !

कोमल दामुद्रे

Poco C55 Features and Specification : Poco ने भारतीय बाजारात Poco C55 लॉन्च केला आहे. सी-सीरीज अंतर्गत येत असलेला हा पोको स्मार्टफोन MediaTek Helio G85 SoC वर काम करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

या फोनमध्ये 6.71 इंच HD+ डिस्प्ले आहे. Poco C55 मध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. 5,000mAh बॅटरी असलेला हा फोन MIUI 13 वर काम करतो. पोकोच्या या स्मार्टफोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1. Poco C55 किंमत व फीचर्स

  • Poco C55 ची 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत (Price) 9,499 रुपये आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना उपलब्ध आहे.

  • कलर पर्यायांसाठी, हा फोन कूल ब्लू, फॉरेस्ट ग्रीन आणि पॉवर ब्लॅक कलरमध्ये येईल.

  • हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 28 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

  • कंपनीने असेही जाहीर केले आहे की Poco C55 बेस मॉडेल पहिल्या दिवशी 8,499 रुपयांना उपलब्ध होईल.

  • तर जास्त स्टोरेज व्हेरिएंट 9,999 रुपयांना उपलब्ध असेल.

  • सवलतीच्या किमतीमध्ये HDFC बँक, SBI बँक आणि ICICI बँक ऑफरचा (Offer) समावेश आहे.

Poco C55 Smartphone

2. Poco C55 वैशिष्ट्ये

  • फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Poco C55 मध्ये Octa Core MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे .

  • हा फोन Android 13 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.

  • या फोनमध्ये 6.71-इंचाचा HD + LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720x1650 पिक्सेल आहे.

  • डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आणि 120Hz चा टच सॅम्पलिंग रेट आहे आणि 534 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे.

  • कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या Poco फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे .

  • त्याच वेळी, समोर 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, 4जी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी पोर्ट समाविष्ट आहे.

  • या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

  • फोन IP52 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनतो.

  • बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी या फोनमध्ये एक्सीलरोमीटर, व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि रियर-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

  • फोनचे ऑनबोर्ड स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT