Pitru Paksha 2025 Saam tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2025: पितृपक्षात नवीन घर किंवा कार घ्यायचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचाच

Pitru Paksha Rituals: पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित काळ आहे. या काळात घर, वाहन खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Manasvi Choudhary

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. पितृपक्ष पंधरा दिवस असतात. पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या पंधरा दिवसात पूर्वज कुटुंबाना आशीर्वाद देतात. यासाठी पिंडदान, श्राद्ध हे विधी केले जातात. पितृपक्षाचा काळ खरेदी करण्यासाठी अशुभ मानला जातो. या दिवसांत नकारात्मक शक्तीचा प्रभाव अधिक असल्याने कोणतेही नवीन कार्य केले जात नाही.

पितृपक्षात नवीन घर किंवा वाहन खरेदी करावे का? दरवर्षीप्रमाणेच यंदाही तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल. यामागे अनेक धार्मिक कार्य आहेत. पितृपक्षाच्या या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

पितृपक्ष म्हणजेच पंधरा दिवसाचा काळ असतो. यामध्ये पूर्वजांची पूजा, श्राद्ध, पिंडदान या विधी केल्या जातात यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.

गरूड पुराणानुसार, या काळात लग्न, गृहप्रवेश, यज्ञ, उपवास ही कामे करू नये. याचा अर्थ असा होतो की हा काळ नवीन कार्यासाठी नाहीतर पूर्वजांच्या शांतीसाठी समर्पित आहे.

शास्त्रानुसार, जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर किंवा वाहन खरेदी करायचे असल्यास त्याची तुम्ही बुंकिग करा. यावेळी पूर्वजांचे स्मरण करा पाणी आणि तीळ अर्पण करा. मनामध्ये प्रार्थना करा यामुळे तुमचे ध्येय पूर्ण होईल. सर्वपित्र अमावस्येनंतर डिलिव्हरी किंवा रजिस्टरी करा. बुकिंगची रक्कम देताना तुम्ही एक रूपया दान करा आणि पाणी अर्पण करा.

शास्त्रानुसार, रजिस्टर आणि बुकिंग हा फक्त एक करार आहे. प्रत्यक्ष तुमचा हक्क, मालकी श्राद्ध पक्षानंतर करावा. बुकिंग करणे हे केवळ भविष्याच्या फायद्यासाठी आहे ते अशुभ नाही मात्र मालकी घेणे म्हणजे डिलिव्हरी हे पितृपक्षानंतर करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT