Pitru Paksha 2025 saam tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pitru Paksha 2025 famous Shradh Pind Daan Places: धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षाच्या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. भारतातील अनेक प्रमुख धार्मिक स्थळे पिंडदान आणि तर्पणासाठी प्रसिद्ध आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मात, पितृपक्षाचा काळा अत्यंत पवित्र मानला जातो.या वर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबर रोजी सुरू झाला असून आणि २१ सप्टेंबर रोजी संपेल. या काळात पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्यासाठी विशेष मानला जातो. शास्त्रानुसार, कुटुंबात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी या काळात पिंडदान करणे आवश्यक आहे. तसेच यामुळे, पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्ति होते. भारतात पिंडदान आणि तर्पणसाठी अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. येथे देशभरातून अनेक लोक त्यांच्या पूर्वजांच्या श्राद्ध आणि तर्पणसाठी येतात, ही ठिकाणं कोणती, जाणून घेऊयात.

फाल्गु नदी, गया (बिहार)

गया हे पिंडदान करण्यासाठी सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मान्यतेनुसार, येथे पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना थेट मोक्ष मिळतो. दरवर्षी हजारो लोक गया येथील फाल्गु नदीच्या काठावर पिंडदान आणि श्राद्ध करतात. स्कंद पुराण आणि विष्णू पुराणातही या ठिकाणाचे महत्त्व सांगितले आहे.

ब्रह्मकपाल, बद्रीनाथ (उत्तराखंड)

उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळील ब्रह्मकपाल घाट हे तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, येथे पूर्वजांसाठी केलेले तर्पण कायमस्वरूपी असतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

सिद्धावत, उज्जैन (मध्य प्रदेश)

उज्जैनमधील सिद्धावत मंदिर देखील पूर्वजांच्या पिंडदान आणि श्राद्धाच्या विधीसाठी एक प्रमुख स्थान मानले जाते. येथील वडाच्या झाडाखाली पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासोबतच या ठिकाणी पिंडदान करणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते.

त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पितृदोषाच्या विधींसाठी प्रसिद्ध आहे. मान्यतेनुसार, येथील गोदावरी नदीच्या काठावर येथे तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार, येथे त्रिपिंडी श्राद्ध नावाचा एक विशेष विधी केला जातो. ही पूजा त्या पूर्वजांसाठी केली जाते जे आपल्या मृत्युनंतरही दुःखी राहतात.

प्रयागराज (उत्तर प्रदेश)

गंगा, यमुना आणि सरस्वती यांचे संगम असलेले प्रयागराज हे एक पवित्र स्थान मानले जाते. या संगमावर पिंडदान आणि तर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबातील दुःख कमी होते.

रामेश्वरम, तमिळनाडू

रामेश्वरम हे दक्षिण भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथील समुद्र किनाऱ्यावर सलेले धनुषकोडी आणि अग्नितीर्थम ही दोन प्रमुख स्थळांवर श्राद्ध आणि पिंडदान विधी केले जातात.असे मानले जाते की, येथे श्राद्ध केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो आणि कुटुंब पितृदोषपासून मुक्त होतो.

प्रिन्सेप घाट आणि हुगळी नदीचे घाट (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे असलेले प्रिन्सेप घाट आणि हुगळी नदीकाठी असलेले इतर घाट पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी आणि श्राद्ध विधी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. येथे मोठ्या संख्येने भाविक त्यांच्या पूर्वजांसाठी प्रार्थना करण्यासाठी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT