Pitru Paksha 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2023 : कुंडलीतीत पितृदोष कसा ओळखाल? पितृपक्षात करा हे उपाय, संकटांपासून होईल मुक्ती

Signs Of Pitru Dosh : यंदा पितृपक्षचा हा पंधरवडा २९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तुम्ही या १५ दिवसात काही उपाय केल्यास अनेक संकटांपासून मुक्त होऊ शकतात.

कोमल दामुद्रे

Pitrudosh In Kundali :

भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत असे काही दोष असतात ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वैज्ञानिकदृष्ट्या जग कितीही पुढे गेले तरी शास्त्रीयदृष्ट्या देखील पुढे गेले आहे.

यंदा पितृपक्षचा हा पंधरवडा २९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे आपल्या पितरांचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही या १५ दिवसात हे उपाय केल्यास अनेक संकटांपासून मुक्त होऊ शकतात.

1. कुंडलीत पितृदोष कसा निर्माण होतो?

कुंडलीतील पाचव्या आणि नवव्या घरात राहू आणि शनि बसल्यास त्या व्यक्तीला पितृदोषाचा (pitrudosh) त्रास सहन करावा लागतो. जर तुमच्याही कुंडलीत हे दोन्ही ग्रह या स्थितीत असतील तर पितृपक्षात हे उपाय करा

2. पितृपक्षात करा हे उपाय

  • अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर धागा पिंपळाच्या झाडाला बांधा. यानंतर त्या पिंपळाच्या झाडाची एकशे आठवेळा प्रदक्षिणा करावी. परिक्रमा करताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करत राहा.

  • तांदूळ (Rice) आणि तूप मिसळून बनवलेले लाडू दर शनिवारी कावळ्यांना आणि माशांना खाऊ घाला.

  • गरीब कुटुंबाला धान्य दान करा, नेहमी शक्य नसेल तर किमान पूर्वजांच्या नावाने तरी करा.

  • गाईला चारा द्या, त्याची सेवा करा, जवाचे दाणेही पक्ष्यांना खायला द्या.

  • तुळ राशींच्या व्यक्तींनी सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी सात धान्य दान करावे.

  • कुलदैवताची पूजाही रोज करावी. पितरांच्या नावाने अन्नदान करावे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

SCROLL FOR NEXT