Piaggio Ape Xtra LDX CNG  Saam Tv
लाईफस्टाईल

Piaggio Ape Xtra LDX CNG : मिनी पण दमदार ! पियाजिओची कार्गो थ्री-व्हीलर लॉन्च...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Piaggio Vehicles Features : पियाजिओ वेईकल्स ही इटालियन ऑटो कंपनी आहे. पिजाजिओ ग्रुपची 100 टक्के उपकंपनी, छोटी व्यावसायिक वाहने बनवणारी आघाडीची कंपनी आणि 3 चाकी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रातील अग्रणी, Piaggio Vehicles Pvt Ltd ने लॉन्च केले आहे.

या कंपनीने नवीन आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. सीएनजीमध्‍ये उपलब्‍ध नवीन आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स ही लांब ५.५ फूट डेकसह चांगले इंधन कार्यक्षमता व सर्वात कमी खर्च देणारी कार्गो थ्री व्हिलर आहे. तसेच यामध्ये २३० सीसी, एअर-कूल्‍ड, नॅच्‍युरली-अस्‍पायरेटेड इंजिनसह (Engine) ३-व्‍हॉल्‍व्‍ह तंत्रज्ञान आहे, ज्‍यामधून चांगले पुलिंग पॉवर, उच्‍च दर्जाची कार्यक्षमता व कमी खर्चात मेन्‍टेनन्‍स मिळेल. ही आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स नवीन अपग्रेड्ससह आल्यामुळे ग्राहकांनी याला अधिक पसंती दिली आहे. जाणून घेऊया फीचर्स व किंमत

1. फीचर्स (Features)

ही आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स २६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढीव ग्रेड क्षमतेमुळे उड्डाणपूल व डोंगराळ भागांमध्‍ये सुलभपणे ड्रायव्हिंग करता येते. याचे टायर्स हे ड्रायव्हिंगसाठी चांगले असतील. तसेच यामध्ये १७.१ एनएमचे सर्वोच्‍च टॉर्क अधिक सुलभपणे वाहून नेण्यास सक्षम ठरेल.

2. इंजिन- मायलेज

२३० सीसी, एअर-कूल्‍ड, ३-व्‍हॉल्‍व्‍ह इंजिन आहे. या गाडीला सीएनजीचे ४० किमीचे दर्जात्‍मक मायलेज उपलब्ध आहे तसेच, ५६ किमी/तासची सर्वोच्‍च गती, ज्‍यामुळे टर्न लगेच घेता येईल. तसेच ड्रायव्हरला आरामासाठी अतिरिक्त हेडरुमही त्यात आहे. ३६ महिन्‍यांची किंवा १,००,००० किमीची सुपर वॉरंटी कमी मेन्‍टेनन्‍स खर्चांची खात्री देते. तसेच यामध्ये सीएनजी, एलपीजी, डिझेल, पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक असो आमच्‍याकडे सर्वांच्‍या गरजांची पूर्तता करणारे उत्‍पादन आहे.

3. किंमत (Price)

आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स २,५१,५८६ रूपये (एक्स-शोरूम, महाराष्‍ट्र) या सुरूवातीच्‍या किंमतीसह सादर करण्‍यात आली आहे आणि भारतातील सर्व पियाजिओ डीलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

4. डिझाइन

आर अॅण्‍डडीने उच्‍च दर्जाची आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स डिझाइन केली, जी अत्‍यंत इंधन कार्यक्षम असण्‍यासोबत सर्वोत्तम मायलेज देते आमच्‍या उद्योजक ग्राहकांना सर्वोत्तम परतावा देते. नवीन एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍ससह ग्राहक उच्‍च गतीमध्‍ये सर्वोच्‍च पुलिंग पॉवरचा अनुभव घेऊ शकतात आणि इंधन खर्चांवरील बचतींमुळे किमान इकोनॉमिकल देखभाल प्राप्‍त करू शकतात. हे उत्‍पादन कमी देखभाल खर्चांमुळे आमच्‍या ग्राहकांच्‍या उत्‍पन्‍नामध्ये वाढ करेल, ज्‍यामधून त्‍यांना उच्‍च फायदा मिळण्‍याची खात्री मिळते.

डिएगो ग्राफी, अध्यक्ष आणि MD, Piaggio Vehicles म्हणाले, आमचा प्रसिद्ध आपे फ्यूएल-अॅग्‍नोस्टिक ब्रॅण्‍ड आहे, जो ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजांसाठी सर्वात अनुकूल पर्याय द्यायला तयार आहे. आमचा ग्राहकांना त्‍यांच्‍यासाठी अनुकूल व्‍हेरिएण्‍ट निवडण्‍याचे स्वातंत्र्य देते. आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही आमच्या ग्राहकांना विश्‍वसनीय, कार्यक्षम व नवोन्‍मेष्‍कारी पर्यायांची श्रेणी देण्‍यास समर्थ आहोत. तसेच या आपेमधून आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम वेईकल देण्याचा प्रयत्न करत आहोत.

पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.च्‍या सीव्‍ही डोमेस्टिक बिझनेस (आयसीई) व रिटेल फायनान्‍सचे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. अमित सागर म्‍हणाले, आपे एक्‍स्‍ट्रा एलडीएक्‍स ग्राहकांच्‍या देखरेख करण्‍यास सुलभ, कमी देखभाल खर्च देणारे आणि त्‍यांच्‍या विविध गरजांची पूर्तता करणारे उत्‍पादन असण्‍या संदर्भातील आवश्‍यकतांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT