कंडोम वापरणे खूप महत्वाचे आहे कारण सेक्स दरम्यान त्वचेचा त्वचेशी संपर्क झाल्यास लैंगिक संसर्गाचा धोका असतो.
कंडोमची सर्वात सामान्य विविधता म्हणजे मानक लेटेक्स कंडोम, जो गर्भधारणा आणि STI संरक्षणासाठी सर्वात विश्वसनीय पर्याय आहे.
लेटेक्सची ऍलर्जी असल्यास, तुमच्याकडे अजूनही अनेक पर्याय आहेत. पॉलीयुरेथेन, पॉलीआयसोप्रीन, नायट्रिल किंवा कोकराचे कातडे बनलेले कंडोम वापरले जाऊ शकतात. ज्यात नॉन लैटेक्स कंडोमचा वापर असेल.
बाह्य कंडोमच्या विरोधात, महिला कंडोमला कधीकधी अंतर्गत कंडोम म्हणतात आणि याचा वापर महिलांच्या (Women) योनीमध्ये केला जातो.
लॅम्बस्किन कंडोम प्राण्यांच्या आतड्याच्या आवरणापासून बनवले जातात. ही सामग्री अधिक नैसर्गिक वाटू शकते किंवा सेक्स दरम्यान याची संवेदनशीलता अधिक वाढली जाते परंतु. ते अधिक छिद्रयुक्त असते.
ज्यांना तोंडावाटे सेक्स करताना लेटेक्सची चव आवडत नाही त्यांच्यासाठी फ्लेवर्ड कंडोम चांगले आहेत.
ग्लोइंग कंडोम वापरणे अजिबात सुरक्षित नाही असे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. ग्लो कंडोम देखील लेटेक्सचे बनलेले असतात आणि इतर कोणत्याही सरासरी कंडोम प्रमाणेच प्रभाव टाकतात.
रिब्ड कंडोम हे नेहमीच्या कंडोमसारखेच असतात, फक्त फरक एवढाच असतो की त्यांची बाहेरील बाजूची वेगळी पोत असते.
काही कंडोम शुक्राणूनाशक रासायनिक पदार्थ वापरतात, जे शुक्राणूंना स्थिर करतात आणि मारतात. त्यासाठी स्पर्मिसाइड कंडोमचा वापर करु शकतो.
पातळ कंडोम किंवा अल्ट्रा थिन बद्दल बोलायचे तर, हे कंडोम पातळ सामग्रीचे बनवलेले असते. हेच कारण आहे की, बरेच लोक त्यांचा वापर करण्यास प्राधान्य देतात कारण ते सेक्सी संवेदना पूर्णपणे कमी करत नाहीत.
लुब्रिकेटेड कंडोममध्ये आत वंगण असते. म्हणूनच तुम्ही वापरणार असलेले वंगण कंडोमशी सुसंगत आहे की, नाही याचा विचार करण्याची गरज नाही.
टिंगलिंग कंडोम त्यात एक विशेष तयार केलेले वंगण असते, ज्यामुळे हा कंडोम दोन्ही भागीदारांना हलक्या संवेदना देतो.
कोणत्याही प्रकारचे कंडोम वापरले जाऊ शकते, परंतु ते गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोगांपासून (Disease) संरक्षण करणे महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.