Aadhar Card Update: आधार कार्डमधील फोटो चांगला दिसत नसल्यास असा करा अपडेट Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhar Card Update: आधार कार्डमधील फोटो चांगला दिसत नसल्यास असा करा अपडेट

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ओळख पुरावा आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड पहिली गरज आहे. तसेच आधार क्रमांकाची जवळपास सर्वत्र मागणी असते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेटेड असणे गरजेचे आहे. तसेच ते तुमच्या मोबाईल फोन नंबरशी जोडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वेळोवेळी लोकांना भारतीय अनोखी ओळख प्राधिकरण यांच्या वतीने मोबाईल नंबरसह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते. अनेक लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील फोटो आवडत नाही. अशा परिस्थितीत तो खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे आपला फोटो अपडेट करू शकतात.

हे देखील पहा -

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

-सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्म डाऊनलोड करा.

-त्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा.

-तुमच्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जा. हा फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक तपशील द्या.

-फॉर्म घेतल्यानंतर कार्यकारी तुमचा फोटो कॅप्चर करणार आणि सिस्टममध्ये अपडेट करणार.

- तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला पंचवीस रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT