Petrol Diesel Price Saam Tv
लाईफस्टाईल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घटले; पेट्रोल- डिझेलच्या भाव कमी होणार?

जगावर महागाईचे संकट वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन यांच्यात युद्ध काही सध्या थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे जगावर महागाईचे संकट वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ- उतार होत असल्याचे बघायला मिळत आहे. पण, देशात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे (Diesel Price) भाव मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सतत किमतींमध्ये होणाऱ्या चढ- उतारांमध्ये देशात किमती मात्र स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलचे आजचे भाव (Petrol Diesel Price) जारी केले आहेत. आज देखील देशात इंधन दरांत कोणताही बदल करण्यात झाला नाही. कच्च्या तेलाच्या भावात आज प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आले आहेत. ही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज सकाळी ७.१५ वाजता नायमॅक्सवर कच्चे तेल प्रति बॅरल $०.५९ वाढल्यानंतर $९७.२४ प्रति बॅरलवर आले आहे. त्यावेळी, ब्रेंट क्रूड ०.७४ टक्क्यांनी वाढल्यावर प्रति बॅरल $१००.६५ वर व्यापार करत आहे. (Petrol diesel prices will come down)

हे देखील पहा-

मागील वर्षी ३ नोव्हेंबर २०२१ दिवशी केंद्र सरकारने पेट्रोलवर असलेले उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपये आणि डिझेलवर (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क ५ रुपयांनी कमी केले होते. यानंतर देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबबरोबर ५ राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) भावात वाढ झाली नसल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, देशामध्ये निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol- Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन ५ दिवस उलटून गेल्यानंतर देखील देशातील पेट्रोल- डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशातील ४ महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे भाव काय?

मुंबई- पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) 109.98 रुपये डिझेलची किंमत (प्रति लिटर) 94.14 रुपये

दिल्ली- पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) 95.41 रुपये,

चेन्नई- पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) 101.40 रुपये, डिझेलची किंमत (प्रति लिटर) 91.43 रुपये

कोलकाता- पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) 104.67 रुपये, डिझेलची किंमत (प्रति लिटर) 89.79 रुपये

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT