Inflation Saam Tv
लाईफस्टाईल

महागाई काय थांबेना! आज पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; CNGचेही दर वाढले

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) वाढत्या किमती सर्वांनाच हैराण करत आहेत. आज पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) वाढत्या किमती सर्वांनाच हैराण करत आहेत. आज पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे. केवळ एका दिवसाच्या दिलास्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर 2 एप्रिल रोजी दिल्लीत (Delhi) पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

12 दिवसात 10 पटीने भाववाढ!;

12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 वेळा वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोलचे दर 7.20 रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी 21 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर होता.

या क्रमांकांवर तुम्हाला नवीन किंमत कळू शकते;

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तर, तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर कोड सापडेल.

हे देखील पहा-

सीएनजीच्या दरातही वाढ;

शुक्रवारी संध्याकाळीच IGL ने घरगुती गॅल म्हणजेच PNG च्या किमतीही वाढवल्याचं जाहीर केलं आहे. आयजीएलने सांगितले की, "पाईपद्वारे स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या पीएनजीची किंमत प्रति एससीएम 5.85 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या वाढलेल्या किमती 1 एप्रिल 2022 पासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर आता दिल्ली NCR मध्ये PNG च्या किमती 41.71/SCM वर गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT