Holi 2022 Tips to Take Care Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2022: त्वचेसंबंधी 'या' समस्या असतील तर होळीच्या रंगांपासून दूर राहा...

पण ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत, त्यांनी होळीचे रंग टाळायला हवे. कारण यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: होळी (Holi 2022) हा रंगांचा सण आहे. होलीकादहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी जर धुळवड खेळली नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. हे दोन दिवस आकाशाचा रंग आकाशी नाही तर पचरंगी झालेला असतो. लोक एकमेकांना अबीर आणि गुलाल लावून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात (People with these skin problems should avoid playing colors in Holi).

पण ज्यांना त्वचेच्या (Skin) समस्या आहेत, त्यांनी होळीचे रंग टाळायला हवे. कारण यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात. जाणून घ्या त्वचेच्या त्या समस्यांबाबत ज्या होळीच्या रंगाने (Colors) आणखी वाढू शकतात.

1. फंगल इन्फेक्शन

एखाद्या व्यक्तीला त्वचेवर फंगल इन्फेक्शनची (Fungal Infection) समस्या असल्यास, खाज सुटण्याची समस्या, लाल पुरळ, जळजळ इत्यादी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत या लोकांनी होळी खेळणे टाळावे. अन्यथा ही समस्या आणखी वाढू शकते.

2. सोरायसिस

सोरायसिसची (Psoriasis) समस्या असली तरी माणसाने होळीच्या रंगांपासून दूर राहावे. सोरायसिसच्या समस्येदरम्यान, एखाद्या व्यक्तीला खाज सुटणे, खवलेयुक्त त्वचा इत्यादींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत होळीचे रंग ही समस्या आणखी वाढवू शकतात.

3. गजकर्ण

जेव्हा एखाद्या व्यक्तीला गजकर्णची (Ringworm) समस्या असते. तेव्हा त्या व्यक्तीने होळी खेळणे टाळावे. गजकर्णला हर्पीज जोस्टर (Herpes Zoster) म्हणतात जे संसर्गामुळे होते. अशा परिस्थितीत हे इन्फेक्शन वेगाने पसरु शकते. होळी खेळल्याने गजकर्णची समस्या अधिक वाढू शकते.

4. एक्जिमा

जेव्हा एखाद्या व्यक्तीला एक्जिमाची (Eczema) समस्या असते तेव्हा तीव्र खाज सुटणे, लालसरपणा येणे, सूज येणे, त्वचेला भेगा पडणे ही लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एक्जिमाची लक्षणं दिसली, तरी होळीच्या रंगांपासून दूर राहावे. अन्यथा ही समस्या आणखी वाढू शकते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT