PCOS Treatment  Saam Tv
लाईफस्टाईल

PCOS Treatment At Home: औषधांची गरज भासणारच नाही! PCOS पासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पाहा

PCOS Treatment : PCOS मुळे महिलांमध्ये अनेक अंतर्गत बदल होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Remedies For PCOS :

स्त्रियांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मासिक पाळी येण्याच्या वेळेत बदल होतात. यालाच PCOS म्हणतात. या आजारावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

सध्या काम आणि घर या दोन्ही गोष्टी हाताळताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये त्यांना स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. वेळवर न जेवणे, योग्य झोप न घेणे, व्यायाम न करणे यामुळे हृदयविकार,लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या समस्या होतात. यामुळेच महिलांमध्ये पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्या वाढत आहेत.

PCOS मुळे महिलांमध्ये अनेक अंतर्गत बदल होतात. त्यामुळे मासिक पाळी वेळेवर न येणे, वजन वाढणे यासारख्या समस्या होतात. या समस्या होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करायला हवेत.

1. हे अन्नपदार्थ खा

PCOS ची समस्या असल्यास आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पीसीओएसमध्ये इन्सुलिनचा धोका जास्त असतो. त्यामुळे आहारात साखर आणि कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ हानिकारक ठरु शकतात. याऐवजी तुम्ही आहारात ओट्स, ब्राउन राइस, ज्वारी, बाजरी यांसरख्या धान्याचा समावेश करा. तुमच्या आहारात अक्रोड, बदाम आणि अळशीचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीरात साखरेची पातळी स्थिर राहते.

याचबरोबर पीसीओएसमुळे होणाऱ्या मुरुमांची समस्या वाढते. यासाठी विटामिन ई आणि विटामिन सी असलेले पदार्थ खा. यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड (PUFAs)असते. यामुळे जळजळ कमी होते. तसेच टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होते. पीसीओएसची समस्या असल्यास फळ, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त अन्न, ब्रोकोली, कोबी, कडधान्य, डाळी, बदाम या पदार्थांचा अन्नात समावेश करा.

2. रोज शारीरिक व्यायाम करा

पीसीओएस हा आजार तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या, रोजच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. दर आठवड्याला शारिरिक क्रिया करणे आवश्यक आहे. यात तुम्ही सायकल चालवणे, चालणे किंवा स्विमींग करणे यासारख्या क्रिया करु शकता. या क्रिया इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत करते.

3. तणावापासून दूर राहा

पीसीओएस आजारात तुम्हाला शरीरासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यात कोर्टिसोल तणाव वाढण्याची शक्यता आहे. तणाव दूर करण्यासाठी ध्यान, योग, दीर्घ श्वास अशा अनेक गोष्टी करायला हव्यात. विशेष म्हणजे, या गोष्टी तुम्ही कोणत्याही वेळी करु शकतात.

4. झोपणे-उठण्याच्या वेळा निश्चित करा

सध्या बदलत्या जीवनशैलीत झोपणे आणि उठण्याच्या सवयींत बदल होतात. हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य वेळ झोप घेणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे पीसीओएसची समस्या असल्यास तुम्ही तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा निश्चित करायला हव्यात. ७ ते ८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT