Manasvi Choudhary
हिंदू धर्मात विवाहाला विशेष महत्व आहे. अनेक प्रथा- पद्धती पार करत विवाह केला जातो.विवाह हे केवळ नातेसंबंध नाही तर एक पवित्र समारंभ आहे.
विवाहमधील प्रत्येक प्रथा - परंपरेमागे एक रहस्य लपलेलं आहे. तुम्हाला माहितीये का लग्नात वधू वराच्या डावीकडे का बसते?
अनेकदा पुजेला बसताना घरातील मोठ्या मंडळीकडून असो किंवा पुजारी कडून देखील तुम्ही असचं ऐकले असेल. मात्र यामागे काय कारण आहे. का वधू वराच्या डाव्या बाजूला बसते हे आपण आज या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
फार पूर्वीपासून विवाह हे प्रथा पद्धतीनुसार पार पाडले जात आहे. आज लग्नात जुन्या प्रथा परंपरा मानल्या जातात. हिंदू धर्मग्रंथामध्ये पत्नीला वामांगिनी म्हणतात म्हणजे 'पतीच्या डाव्या बाजूला स्थित'
डावी बाजू ही हृदयाच्या सर्वात जवळ मानली जाते म्हणून लग्नाच्या वेळी वराच्या डाव्या बाजूला वधू बसते. आयुष्यभर वधूने वराच्या हृदयाच्या जवळ असण्याचे यामागचे प्रतीक मानले जाते.
वधू वराच्या डाव्या बाजूला बसते आणि सर्व विधी करते तेव्हाच हवन किंवा पूजा पूर्ण असं मानलं जाते.ही परंपरा देव- देवतांच्या कथांशी देखील जोडली आहे. देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला बसते.