Manasvi Choudhary
हिवाळी मौसमात पेरू या फळाचे सेवन केले जाते. पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? पेरू आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी पेरूच्या बिया चघळल्याने पचनाच्या समस्या होऊ शकतात.
ज्या लोकांची पचनसंस्था कमकुवत आहे अश्या लोकांना पेरू खाताना आरोग्याची काळजी घ्यावी.पेरूच्या बिया या खूप कठीण असतात यामुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.
पेरूच्या बिया या कठीण असतात यामुळे ते चघळल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवतात. बद्धकोष्ठता आणि पोटफुगी या पोटाच्या समस्या पेरूच्या बिया खाल्ल्याने निर्माण होतात.
ज्या लोकांची पचनसंस्था आधीच कमकुवत आहे अश्यांनी पेरू खाताना बिया काढून खावे नाहीतर कमी प्रमाणात खाणे फायद्याचे राहील.
पेरू खाताना, जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल, तर बिया काढून खाणे किंवा त्या पूर्णपणे न चावता कमी प्रमाणात खाणे जास्त फायदेशीर ठरते.
पेरू खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. केळी व दुधाचे पदार्थ खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.