Manasvi Choudhary
हॉटेलमध्ये मिळते अशी भेंडी मसाला ग्रेव्ही तुम्ही सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. भेंडी मसाला ग्रेव्ही बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
भेंडी मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी भेंडी, कांदा टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, दही, तेल,जीरा पावडर, हिंग, हळद, धना पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून ती पुसून कोरडी करा. भेंडी ओली राहल्यास ती चिकट होतील. कोरडी झालेली भेंडी उभ्या आकारात बारीक कापून घ्या.
गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये भेंडीचे बारीक केलेले तुकडे मध्यम आचेवर हलकेचे परतून घ्या यामुळे भेंडी चिकट होणार नाही. साधारण फ्राय केलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्या.
कढईमध्ये थोडेसे तेल घाला त्यात जीरे आणि हिंग टाका. नंतर यामध्ये कांदा परतून घ्या. संपूर्ण मिश्रणात आलं - लसूण, गरम मसाला, दही घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. मिश्रण ३ते ५ मिनिटे परतून घ्या.
आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ टाका म्हणजेच तुमची भेंडी स्पेशल ग्रेव्ही तयार होईल.
मसाला ग्रेव्ही शिजल्यानंतर भेंडी मिक्स करा आणि मिश्रणावर झाकण लावा नंतर तयार भाजीत कोथिंबीर आणि आमचूर पावडर टाका अशाप्रकारे तुमची स्पेशल भेंडी मसाला ग्रेव्ही तयार होईल.