Tawa Vastu Shastra saam tv
लाईफस्टाईल

Tawa Vastu Shastra: किचनमध्ये तवा वापरताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष द्या; एक छोटी चूक पडेल महागात

Tawa Vastu Shastra: वास्तू शास्त्रामध्ये किचनमधील तव्याबाबत काही नियम देण्यात आले आहेत. हे नियम नेमके काय आहेत, ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येकाचं घर हे एक स्वप्न असतं. आणि आपल्या स्वप्नातील घरात सुख-समृद्धी कोणाला नको असते? अनेकदा असं घडते की घरात किंवा कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी होत नाहीत. परिणामी चिडचिड वाढते. यामागे अनेक कारणे असू शकतात. यामधील एक कारण म्हणजे घरातील वास्तू दोष हे देखील एक कारण असू आहे.

असं म्हणतात, वास्तू नेहमी आपल्याला तथास्तु म्हणते. या वास्तूनुसार, किचनमध्ये ठेवल्या जाणाऱ्या भांड्यांबाबत काही खास नियम आहेत. त्यामुळे किचनमध्ये आपण भांडी कुठे ठेवतो, यावर लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तू शास्त्रामध्ये किचनमधील तव्याबाबत काही नियम देण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया हे नियम काय आहेत.

तवा उलटा ठेऊ नये

वास्तुशास्त्रानुसार, कधीही तुमच्या घरातील गॅसवर तवा उलटा ठेवू नये. वास्तू शास्त्रानुसार, असं मानलं जातं की, की असं केल्याने घरातील सुख, शांती आणि समृद्धी निघून जाते. याशिवाय घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. याचा त्रास घरातील व्यक्तींना होऊ शकतो.

घरातील पाहुण्यांना दिसू नये

घरा बाहेरील लोकं किंवा पाहुण्यांना दिसू नये अशी किचनमध्ये तव्याची जागा असली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा. बाहेरच्या व्यक्तीला दिसणं शास्त्रामध्ये अशुभ मानलं जातं.

तवा साफ करताना कोणत्या काळजी घ्याल?

दररोज तवा वापरल्याने तो साफ करताना काही प्रकारची काळजी घेणं गरजेचं असतं. यावेळी घरातील तवा साफ ​​करताना तीक्ष्ण वस्तू कधीही वापरू नका. वास्तुशास्त्रानुसार, अशा गोष्टींचा वापर केल्यास घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. शिवाय तुमच्या घरी कायम गरीबी राहण्याचा धोका असतो.

ही चूक करू नका

अनेकजण गरम तव्यावर पाणी टाकतात. मात्र तुम्हीही ही गोष्ट करत असाल तर आजच सावध व्हा. वास्तू शास्त्रानुसार, गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. असं केल्याने घरामध्ये वाद वाढण्याचा धोका असतो.

तवा कधीही खराब ठेऊ नये

घरात जेवण बनवताना तव्याचा वापर केल्यानंतर तो तसाच ठेवून देऊ नये. तव्याचा वापर झाल्यानंतर नेहमी तो साफ ठेवावा. तवा असाच ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

Bank Scam : कर्नाळा बँकेचा ५०० कोटींचा घोटाळा, माजी आमदाराच्या १०२ एकर जमिनीचा होणार लिलाव

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

SCROLL FOR NEXT