Child Obesity Saam Tv
लाईफस्टाईल

Child Obesity: पालकांनो, मुलांचे वाढलेले वजन ठरु शकते आरोग्याला धोकादायक; वेळीच 'या' गोष्टींवर लक्ष द्या !

आजकाल लठ्ठपणाची समस्या सामान्य आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Child Obesity: आजकाल लठ्ठपणाची समस्या सामान्य आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) प्रौढांबरोबरच लहान मुलेही (Child) त्याला बळी पडत आहेत. बर्‍याच वेळा पालकांना वाटते की 'लठ्ठ बाळ हे निरोगी असण्याचे लक्षण आहे' पण मग ते लहान मुले असो वा प्रौढ, लठ्ठपणाला बळी पडणे हे कोणत्यातरी धोकादायक आजाराचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलालाही लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी. मुलांच्या वाढत्या लठ्ठपणाची समस्या भविष्यात मोठ्या आजारांना जन्म देऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुलांचा लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. आजकाल मुलंही लठ्ठपणाच्या आहारी जात आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या खाण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आहारात सकस आहाराचा समावेश करा. चला तर मग जाणून घेऊया मुलांना लठ्ठपणापासून दूर ठेवण्यासाठी काय करायला हवे?

१. शारीरिक क्रियाकलाप -

आजकाल प्रत्येकाचे जीवन व्यस्त आहे, अशा परिस्थितीत मुलांना वेळ काढणे कठीण आहे आणि मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून पालक त्यांना मोबाईल, संगणक देतात. अशाप्रकारे, त्यांची कोणतीही शारीरिक हालचाल होत नाही आणि संपूर्ण वेळ स्क्रीनवर घालवला जातो. त्यांना सायकल चालवणे, पोहणे, चालणे इत्यादी क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा. यामुळे कॅलरीज बर्न होतील आणि हाडे मजबूत होतील.

२. झोप -

झोपेच्या कमतरतेमुळे वजनही वाढते. चांगली झोप घेतल्याने अनेक आजार टाळता येतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलाला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचे वजन वाढू शकते. मुलांना योग्य वेळी झोपण्याचा सल्ला द्या. यामुळे ते निरोगी आणि ताजे राहतील.

३. जंक फूड नको -

आजकाल मुलांना तेलकट आणि मसालेदार पदार्थ जास्त आवडतात. त्यांना चॉकलेट, कोल्ड्रिंक्स इत्यादी साखरयुक्त पदार्थ आवडतात. या आहारामुळे मुले लठ्ठपणाला सहज बळी पडतात. मुलांना हिरव्या भाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये खाण्याची सवय लावा.

४. तणाव -

मुलांमध्येही तणावाची समस्या वाढत आहे. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासावर अभाव होऊन त्यांना ते ओझ्यासारखे वाटू लागले आहेत. अशा प्रकारे ते लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्या. सुट्टीत त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. यामुळे मुलांशी तुमचे नाते घट्ट होईल आणि त्यांना एकटेपणा जाणवणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT