Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : परीक्षेच्या वेळी मुलांना Emotional आधार कसा द्याल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Exam Stress :

मुलांच्या परीक्षा जवळ येत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर अभ्यासाचेही खूप दडपण असते. जास्त मार्क्स मिळवण्याच्या प्रयत्नांमुळे मुलांना अभ्यासादरम्यान थोडा ताण येतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुले केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्थितीत पालकांनीही (Parents) त्यांना साथ दिली पाहिजे.

भावनिक आणि मानसिकदृष्ट्या (Mental Health) मजबूत असणं अशा गोष्टी आहेत ज्यावर प्रौढ लोक देखील नियंत्रण ठेवू शकत नाहीत. विशेषत: परीक्षेत मुलांनी भावनिकदृष्ट्या खंबीर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल थोडे तणावात आहे आणि ते भावनिकदृष्ट्या कमकुवत आहे, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून त्याला आधार देऊ शकता.

भीती वाटणे

अनेक वेळा पालकांना आपल्या मुलाने प्रत्येक शर्यतीत पुढे जावे असे वाटते. मुलांच्या शिक्षणाचा विचार केला तर पालक थोडेसे पझेसिव्ह होतात. पराभवाशी संबंधित मुलांच्या चिंतेबद्दल ते ऐकत नाहीत. अशा स्थितीत त्यांची भीती ऐकणे गरजेचे आहे. तुमच्या मुलांना भीतीशी लढायला शिकवा, जेणेकरून त्याला अशक्तपणा जाणवू नये.

सकारात्मक विचार

पालक म्हणून प्रत्येक स्थितीत आपल्या मुलांना सकारात्मक राहायला शिकवणे हे आपले कर्तव्य आहे. तुमच्या मुलांना कोणत्याही विषयाची भीती वाटत असल्यास, सकारात्मक राहून स्थितीचा सामना कसा करायचा हे शिकवा.

स्पर्धेची भावना ठेवू नका

बोर्डाच्या परीक्षेतील काही स्पर्धांमुळे मुलेही तणावाखाली राहतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना समजून घेताना त्यांच्यात अशा भावना निर्माण होऊ देऊ नयेत. जेव्हा एखाद्या मुलामध्ये अशा भावना असतात तेव्हा तो तणावाखाली अभ्यास करतो आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

मुलांवर ओरडू नका

काही मुलांना परीक्षेत कामगिरी करता येत नाही. अशा स्थितीत पालक त्यांना टोमणे मारतात पण यामुळे मूल थोडे अधिक भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते. परीक्षेदरम्यान मुलांशी सतत बोलत राहा आणि त्यांना प्रेरित करत राहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT