Parenting tips, kids health tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Parenting tips : मुलांना सतत जंक फूड खाण्याची सवय आहे ? ती सवय कशी मोडाल ?

मुलांना आहारात कोणते पदार्थ द्याल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : मुलांच्या वाढीसाठी त्यांच्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक घटकांची आवश्यकता असते. काही मुलांना हेल्दी आणि पोषक आहारापेक्षा जंक फूड जास्त आवडते.

हे देखील पहा -

वयोमानानुसार मुले (Child) अधिक हट्टी बनू लागतात. मुलांनी सतत जंक फूड खाल्ल्यास त्यांच्या शरीरासाठी ते अधिक घात ठरते. तसे, मुलांमध्ये जंक फूड किंवा स्ट्रीट फूडचे सेवन करणे आजकाल सामान्य झाले आहे. मात्र जास्त जंक फूड खाल्ल्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर (Health) होतो. अशा परिस्थितीत अनारोग्यकारक गोष्टी खाल्ल्याने मुलांच्या शरीरात पोषणाची कमतरता तर होतेच पण त्यामुळे मुलांची वाढही खुंटते. चला तर मग जाणून घेऊया मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्याचे काही सोपे उपाय.

१. मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे बाहेरचे अन्न कमी करावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांच्या आवडीचे पदार्थ घरी बनवून खाऊ शकता. यासोबतच पिझ्झा, बर्गर, नूडल्स यांसारख्या गोष्टींमध्ये भाज्या मिसळून मुलांचा आवडता पदार्थही तुम्ही निरोगी बनवू शकता. त्यामुळे मुलांना घरचे जेवणही आवडेल आणि बाहेरच्या वस्तू खाणे कमी होईल.

२. सुंदर आणि रंगीबेरंगी गोष्टींकडे मुलं पटकन आकर्षित होऊ लागतात. अशा स्थितीत मुलांच्या खाण्याच्या पदार्थाच रंगांची फळे सजवून मुलांना आपण देऊ शकतो. यासोबतच ताटात सुंदर सजवलेल्या रंगीबेरंगी फ्रूट चाटही मुलांना आवडतील. याशिवाय अनेक आकारात रोट्या बनवून त्यांना खायला घालूनही मुले सहज खातात.

३. यासाठी ३ ते ४ वर्षाच्या मुलांची दिनचर्या निश्चित करा. त्यांना आरोग्यदायी गोष्टी खायला द्या. त्यामुळे मुलांचे पोट भरले जाईल आणि मुले जंक फूड खाण्याचा अजिबात आग्रह धरणार नाहीत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्युत पोलचा शॉक लागल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू

IND vs AFG Test Match: टीम इंडियानं उभारला ५६४ धावांचा डोंगर, गिलचे वादळी शतक, पंतनेही झोडपले

एक रुपयाही खर्च न करता मिळवा कोरियन मुलींसारखे सरळ-सिल्की केस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पाहा महत्त्वाची अपडेट

Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

SCROLL FOR NEXT